शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चारोटीनाका येथे रोजच ट्रॅफिक जॅम

By admin | Updated: April 15, 2016 01:14 IST

सध्या या महामार्गावर ठिकठिकाणी आय आर बी कंपनी मार्फत उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने रोज वाहतूकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात

डहाणू/ कासा : सध्या या महामार्गावर ठिकठिकाणी आय आर बी कंपनी मार्फत उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने रोज वाहतूकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात त्यांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलीस नसतो. ठीक ठिकाणी खोदाईचे काम सुरु असताना वाहनांची वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने रोज वाहतूक कोंडीत भर पडते आहे. या महामार्गावरील चारोटीनाका येथे उड्डाण पुलाचे काम गेल्या एक महिन्यापासून आय आर बी कंपनीने सुरु केले आहे. याच ठिकाणहून डहाणू नाशिक मार्ग जातो. खर तर या ठिकाणी वाहतूक खोळंबा नियंत्रित ठेवण्यासाठी कंपनीचे गार्ड किवा महामार्ग वाहतूक पोलीस तैनात असले पाहिजेत . परंतु येथे कुणीही नसते. दररोज सकाळी दोन्ही वाहिन्यांवर तसेच डहाणू नाशिक राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. नेमक्या याचवेळी महामार्ग पोलीस ज्या ठिकाणी चढ रस्ता असेल तेथे पावत्या फाडणे किवा इतर कारणासाठी गाड्या थांबवत बसतात अशा हलगर्जीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे तसेच रुग्णवाहिकेमधून जाणाऱ्या रुग्णांचेही मोठ्या प्रमाणात हाल होतात. येत्या २२ एप्रिलपासून प्रसिद्ध महालक्षमी यात्रा सुरु होत आहे. येथे दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येतात त्यामुळे आताच उपाय योजना न केल्यास स्थिति गंभीर होईल. (वार्ताहर) या संदर्भात स्थानिक कासा पोलीस ठाण्याकडूनहि अनेक वेळा आय आर बी आणि महामार्ग पोलिसांना सूचना करूनही कोणतीही उपाय योजना होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येतोय. याबाबतीत आय आर बी आणि एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केलीय.