शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:20 IST

पालघर-वसईत ८१ टक्के मतदान : अटी-नियम पाळत लावल्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/पारोळ : पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये गावचा कारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. पालघर तालुक्यातील एक आणि वसई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी एकूण ८१.४५ टक्के मतदारांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. कोरोनासंदर्भातले नियम व अटींचे पालन करीत शांततेत मतदान पार पडले.पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीसाठी ८९.३८ टक्के मतदान झाले. वसई तालुक्यातील पाली येथे ८३.१५ टक्के तर सत्पाळा येथे ७९.३३ टक्के मतदान झाले. या तीनही ग्रामपंचायतींतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत होते. कोरोनाकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केली होती. यात पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश होता. पालघरमधील सागावे आणि वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी प्रशासन पूर्ण सज्ज होते. दरम्यान, वसईतील दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये १५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ३५ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. या दोन्ही ठिकाणी मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह होता. 

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ही निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेतली होती. मास्क असल्याने मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर याबाबतची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावर हात धुण्याची सोयही करण्यात आली हाती, तर सॅनिटायझरही ठेवण्यात आले होते. तर मतदान करताना प्रत्येक मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. मतदान करताना मतदान केंद्रावर प्रथमच व्यवस्था असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.ग्रामपंचायत निवडणूक ही वर्षातील पहिली व यापुढे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक व वसई विरार शहर महापालिका निवडणूक यांची नांदी असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपली या निवडणुकीत बाजी लावली आहे. सत्पाळ्यात बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप यांच्यात लढत असून, पालीमध्ये महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी यांच्या पुरस्कृत उमेदवारांमध्ये लढत होत आहे. या सर्व उमेदवारांच्या आशा, निराशा मतपेटीत बंद झाल्याने आता तालुक्याचे लक्ष १८ तारखेला होणाऱ्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार