शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आठ तासांचे भारनियमन

By admin | Updated: May 29, 2014 23:54 IST

विक्रमगड तालुक्यातील शहरासह बर्‍याच भागात वीज मंडळाचा फारच गोंधळ उडत आहे. ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे दिवसातून तीन वेळेत बेफिकीर भारनियमन होत आहे.

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील शहरासह बर्‍याच भागात वीज मंडळाचा फारच गोंधळ उडत आहे. ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे दिवसातून तीन वेळेत बेफिकीर भारनियमन होत आहे. विक्रमगड तालुक्यात तीनवेळेस साडेआठ तासांचे सक्तीचे त्रासदायक भारनियमन चालू असतानाही वीज ग्राहकांचा अंतच पाहात असून रोज एवढे भारनियमन करुन देखील शुक्रवारी दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल साडेबारा तास भारनियमन केल्यामुळे येथील व्यवसाय ठप्प झाले आहेत. शेती व्यवसायालाही या भारनियमनामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, सोबतच या भारनियमनचा फटका आरोग्य सेवेलाही बसला असून येथील एक्सरेमशिन व विजेवर चालणारी अनेक यंत्रे बंद असल्याने त्याचा रुग्णांनाही त्रास होत आहे. अगोदरच कमी विजेच्या दाबामुळे अनेक इलेक्ट्रीक यंत्रे निट चालत नाहीत व साडेआठ तासांचे भारनियमन व त्यात शुक्रवारी पूर्ण दिवस वीज नसल्याने सर्वच व्यवहार ठप्प होत असल्याने येथील जनता या महावितरणच्या या बेफिकीर भारनियमनाला पुरती कंटाळलेली असून नाराजी व्यक्त करीत आहे़ महाराष्ट्र शासनाने संपुर्ण महाराश्ट् भारनियमन मुक्त करण्याचे आष्वासन दिले होते तर मग हे आष्वासन आहे कुठे असा सवाल विज ग्राहक विचारीत आहेत़या भारनियमनामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असुन अनेक व्यापार बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तर अनेकांचे व्यवसाय बंद पडल्याने उपासमारी ओढवली आहे.