शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू तालुक्यातील ९ वीचे प्रवेश धोक्यात

By admin | Updated: May 21, 2017 03:35 IST

या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे.

- शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पण आता आठवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना नववीत कुठे आणि कसा प्रवेश मिळवून द्यायचा हा प्रश्न पालकांना भेडसावतो आहे. तो वेळीच न सुटल्यास हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक फरपट होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पाच किमी परिसरात माध्यमिक शाळा असणे गरजेचे आहे. परंतु डहाणू या आदिवासीबहुल तालुक्यातील माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन तुकडी मंजूर नाही, बसायला जागा नाही अशी उत्तरे देऊन पालकांना पिटाळून लावत आहेत. त्यामुळे आपला पाल्य शिकला पाहिजे ही आशा उराशी बाळगून माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या गरीब, निरक्षर पालकांच्या पदरी निराशा पडत आहे.एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागलेली असतांना डहाणू, तलासरी सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांना नववीत प्रवेश मिळू नये ही महाराष्ट्रातील शिक्षणाची शोकांतिका आहे. या वर्षी आठवीत किती मुले उत्तीर्ण झाली व जिथे नववीची इयत्ता नाही अशा शाळांतील मुलांना कुठे आणि कसा प्रवेश द्यायचा याचे नियोजन माध्यमिक शिक्षण खात्याने केलेले नाही. हेच यावरून उघड झाले आहे. यामुळे ज्या शाळेत ही मुले आठवी उत्तीर्ण झाली त्याच शाळांना नववीचे वर्ग सुरू करायला लावणे योग्य ठरेल.पालक झाले संतप्तजर हा प्रश्न वेळीच सुटला नाही तर त्यासाठी मोर्चा काढण्याची सज्जता आदिवासी बांधवांनी केली आहे. मोर्चासाठी आमचा एक दिवसाचा रोजगार बुडाला तरी चालेल ते नुकसान आम्ही आमच्या लेकराबाळांसाठी सहन करू पण त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.आता माध्यमिक शिक्षण अधिकारी इतके दिवस झोपले होते का व आता ते कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.