शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:03 IST

तोडलेली बांधकामे काही दिवसांनी पूर्ववत होत असल्याचा आरोप

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील काही अनधिकृत बांधकामे व शेड शुक्रवारी तोडण्यात आल्या. मात्र, अशा प्रकारे अनेक अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आज तोडलेले बांधकाम काही दिवसांनी पूर्ववत होत असल्याने तोडक कारवाई ही एक फार्स ठरत असल्याचे बोलले जात आहे.

तारापूर एमआयडीसी क्षेत्रात शेकडो अनधिकृत बांधकामे सध्या दिमाखात उभी असून वर्षातून कधीतरी होणारी कारवाई ही दिखाऊ ठरत असल्याची टीका केली जात आहे. इतर अनधिकृत बांधकामांकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप होत आहे. शुक्रवारी फक्त तीन ढाब्यांच्या शेड तोडण्यात आल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून कारवाईपूर्वी तीनही ढाब्यांचे पत्रे ढाबाचालकांनीच खाली उतरवले होते. तर, कारवाईत दुजाभाव केल्याचा आरोप काहींनी केला. दरम्यान, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई हाती घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूरचे उपकार्यकारी अभियंता संदीप बडगे यांनी दिली. 

टॅग्स :MIDCएमआयडीसीVasai Virarवसई विरार