शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वसई-विरारमध्ये १० बाधितांचा मृत्यू, दिवसभरात ३२२ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:52 IST

वसई-विरारमध्ये दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी तब्बल ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे.

वसई : वसई-विरार महानगरपालिका हद्दीमध्ये शुक्रवारी दिवसभरात ३२२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आता एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ३४४ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी तब्बल ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे.वसई-विरार महापालिका हद्दीत दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. शुक्रवारी दहा रुग्णांनी या जीवघेण्या आजारात आपले प्राण गमावले आहेत. यामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १५० झाली आहे. तर दिवसभरात ३२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता एकूण बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ३४४ झाली आहे. मात्र त्याच वेळी दिवसभरात ६०३ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवल्यामुळे काहीसा दिलासाही मिळाला आहे. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४९३१ झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण उपचार घेणाऱ्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.बोईसरमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्हबोईसर : येथील भीमनगर वसाहतीतील एका व्यक्तीला सहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्याच कुटुंबातील अन्य १६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून भीमनगरची वसाहत शुक्रवारी सील करण्यात आली.दांडी पी.एच.सी. क्षेत्रातील बोईसर परिसरात आतापर्यंत ९० रुग्णांची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दलाल टॉवरमध्ये बोईसरमधील पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत सुमारे ७५ दिवसात ९० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत सुमारे साठ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.उर्वरित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज एकाच दिवशी १६ नवे रुग्ण सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचना व निर्देशांचे योग्य पद्धतीने आणि काटेकोर पालन होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असून हीच परिस्थिती कायम राहिली तर बोईसर हॉट स्पॉट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार