शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणीत कोरोनाचा अहवाल अडकला; रुग्णालयात मृतदेह सहा दिवसापासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:54 IST

दरम्यान विरार पश्चिम ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- आशिष राणे

वसई : विरार स्थित एका अवघ्या 15 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल तांत्रिक अडचणीत सापडल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तब्बल सहा दिवसांहुन अधिक दिवस हा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात ताटकळत उभे राहायची वेळ आली आहे.

दरम्यान विरार पश्चिम ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मागील सहा दिवसांपासून मृताचे कुटूंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर पडून आहे तर  सहा दिवस उलटूनही मृतदेह मिळत नसल्याने मृतदेहासह त्याच्या कुटुंबियांची हेळसांड होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम स्थित  ग्लोबल सिटी येथील एका भाजी विक्री करणाऱ्या राजा गुप्ता या 15 वर्षीय तरुणाला गावगुंडांनी पोटात लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. या घटनेच्या दोन दिवसानंतर दि.25 जून रोजी या तरुणाचा मृत्यू झाला तसेच पुढील तपासासाठी विरार पोलिसांच्या विनंतीनुसार रुग्णालया मार्फत मृतदेहाची कोरोना चाचणी देखील करण्यात आली.

मात्र आज सहा दिवस उलटूनही मृताचा कोरोना अहवाल अद्यप आला नसल्याने संपूर्ण कुटुंबीय रुग्णालयाबाहेर ठाण मांडून आहेत. एकतर आधीच कोरोनामुळे ओढवलेल संकट व त्यात आपल्या घरातल्या मुलाचा  झालेला अकस्मात मृत्यू यात आधीच पायाखालची जमीन सरकली असताना त्यात ही एक नवी समस्या डोकं वर करून गुप्ता कुटुंबियांसमोर उभी आहे. परिणामी विरार ग्रामीण रुग्णालय कोरोना चाचणीत हलगर्जीपणा करीत असल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाचा  भाऊ अजय गुप्ता यांनी केला आहे. रुग्णालयाच्या वतीने कोरोना चाचणीचे स्वॅप हे मुंबईत पाठवून देण्यात आले होते. मात्र तेथील रूग्णालयातील काही अडचणींमुळे हा अहवाल अद्यप आला नसल्याचे कारण रुग्णायाच्या वतीने देण्यात आले आहे.  या प्रकरणी रुग्णालयाला विचारले असता येत्या एक दिवसांत हा मृतदेह अहवाल आल्यानंतर हा मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस