शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेके

By admin | Updated: March 24, 2017 00:55 IST

विक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम

हितेन नाईक / पालघरविक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक ठेके एका कंत्राटदाराने मंजूर करवून घेतले असून त्या ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर चालढकल करीत आहेत.केव गावातील सर्व्हे नंबर २५७ हि जमीन विकास पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असून पूर्णत: बागायती क्षेत्र आहे.मात्र ह्या क्षेत्रामध्ये डांबर प्लँट असल्याचे खोटे पुरावे सादर करून नाशिकच्या आर के सावंत यांनी अनेक ठेके मिळविले आहेत. केव, शिळशेत, नालशेत, ह्या ग्रुप ग्रामपंचयातींनीही आमच्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा डांबर प्लॅन्ट अस्तित्वात नसल्याचा दाखल दिला आहे. या बेकायदेशीर कंत्राटात जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील यांत्रिकी विभागाचे काही अधिकारी सामील आहेत. ह्या खोट्या बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन आजही अनेक ठेके मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.या प्रकरणात पालक मंत्री विष्णू सवरा ह्यांनी २ जानेवारी २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिलेल्या पत्रात विक्रमगड (आलोंडे) येथील मे. हार्दिक कन्स्ट्रक्शनने केलेल्या तक्र ारींचा उल्लेख करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर व जव्हार यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची कंत्राटे मिळविल्याचे नमूद करून. या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मिळविलेल्या ठेक्यांची चौकशी करण्याचे पालक मंत्र्यांनी सुचविले आहे. तरीही कार्यकारी अभियंत्यांनी कारवाई केलेली नाही.सार्वजनिक विभागाच्या हलगर्जी मुळे जव्हार विभागात येणाऱ्या विक्रमगड आणि इतर तालुक्यातील जवळपास ५५ विकासकामे मान्यते अभावी रखडली असून बोगस कागदपत्रे दाखवून या निविदा भरण्यात आल्या आहेत. आर के सावंत (नाशिक) या नावाने वेगळ्याच ठेकेदारांनी कामे मिळवली असून निविदाहि मंजूर झाल्या आहेत. परंतु या निविदांसोबतची कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असतांनाही दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदाराला कंत्राट देणे क्रमप्राप्त असताना अजूनही तो देण्यात आलेला नाही.किंवा फेर निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यानंतर पावसाळा सुरु होणार असल्याने कामे तातडीने सुरु करणे गरजेचे असतांनाही ती सुरु केली जात नाहीत. बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यालाच ठेका देण्याचा अट्टाहास सां.बां.चे काही अधिकारी करीत असल्याचे दिसून येते.