शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोलाचे पाणी तत्काळ बंद करा

By admin | Updated: April 14, 2016 00:43 IST

तालुक्यातील कुडूस येथील हिंदुस्थान कोका-कोला ही कंपनी दिवसरात्र लाखो लिटर मागणी वैतरणा नदीतून उचलते. सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू आहे. तालुक्यातील महिलांना

वाडा : तालुक्यातील कुडूस येथील हिंदुस्थान कोका-कोला ही कंपनी दिवसरात्र लाखो लिटर मागणी वैतरणा नदीतून उचलते. सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू आहे. तालुक्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या आशिर्वादाने कंपनी दररोज भरपूर पाणी घेते. याला वाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शविला असून कोकाकोलाचे पाणी तात्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.वाडा तालुक्यात १ मार्च पूर्वीच नद्या, विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली चालली आहे. कित्येक वर्षापासून भूजलाच्या पाण्याचा सर्व्हे झालेला नाही. तो झाला पाहिजे. तालुक्यात बहुतांशी कूपनलिका, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी व नदी नाले मार्च मध्येच कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे कोका-कोला कंपनीचा पाणीपुरवठा त्वरीत खंडीत करून संपूर्ण जलसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा अशी मागणी कुणबी सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख प्रफुल्ल पाटील यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन तसे न झाल्यास येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.या संदर्भात वाडा पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोका-कोला कंपनीला पाणी उचलण्याची सरकारने दिलेल्या परवानगीची मुदत मार्च महिन्यातच संपली असून तालुक्यातील पाणीटंचाई पाहता कंपनी उचलत असलेले वैतरणा बंधाऱ्याचे पाणी बंद करण्यात यावे अशी मागणी करणारा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत केला असल्याची माहिती पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे यांच्याशी संपर्क साधला असता कोका-कोला कंपनीचे पाणी प्रशासनाने बंद केले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आचारसंहिता संपताच मोर्चा काढून पाणी बंद करण्यात येईल असे पठारे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सदानंद पाटील यांनी आमची सर्वपक्षीय आंदोलन करण्याची तयारी सुरू असून प्रशासनाने कोका-कोला कंपनीचे पाणी बंद केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. (वार्ताहर)