शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर-डहाणूबद्दल परेचा सावत्रपणा

By admin | Updated: December 24, 2016 02:57 IST

पालघर-डहाणू भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा बहाल करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही या भागाला उपनगरीय सेवा मिळालेल्या

पालघर : पालघर-डहाणू भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा बहाल करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही या भागाला उपनगरीय सेवा मिळालेल्या नाहीत. उलट सतत काहींनाकाही कारणास्तव इथल्या प्रवाशांच्या मागण्यांकडे पश्चिम रेल्वे सतत दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाश्यांनी निषेधाचे बॅनर वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या स्थानक परिसरात लावून आपला संताप व्यक्त केला आहे.डहाणू रोडपर्यंतच्या भागाला सन १९९५ रोजी उपनगरीय क्षेत्राचा दर्जा बहाल केल्या नंतर तब्बल १८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर १६ एप्रिल २०१३ रोजी प्रथम चर्चगेट-डहाणू लोकलला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे इथल्या स्थानिक प्रवाशांनी या लोकलचे जल्लोषात स्वागत केले होते. आता आपला मुंबई पर्यंतचा प्रवास आता सुखकर होईल अशा दिवास्वप्नात असणाऱ्या प्रवाशांच्या अनेक मागण्यांना हरताळ फासण्याचे काम पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलेले आहे.मेल-एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या मधून प्रवास करण्यावर एके ठिकाणी निर्बंध घातले जात असताना दुसरीकडे त्यांच्यासाठी सुरु करण्यात आलेल्या काही मोजक्या लोकलमध्ये जबरदस्तीने शिरकाव करून उलट स्थानिक प्रवाश्यांच्या हक्कावर विरारच्या काही प्रवाशांकडून गदा आणली जात आहे. अश्या वेळी घुसखोरी करणाऱ्या विरार प्रवाश्यांच्या विरोधात रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानानी कारवाई करणे अपेक्षित असताना उलट पालघरच्या प्रवाशाना मारहाण करून त्यांचावर केसेस नोंदविल्या जात आहेत. सोयीसुविधा पुरविण्याबाबत ही सतत अन्याय केला जात असल्याने प्रवाश्यामध्ये असंतोष पसरत आहे. (प्रतिनिधी)