कठोर परिश्रमांच्या शिकवणीतून मिळाली करिअरची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:13 AM2019-09-05T00:13:24+5:302019-09-05T00:13:42+5:30

सर्वसामान्य मुलगा ते पोलीस अधीक्षक हा टप्पा गाठणाऱ्या गौरव सिंग यांना कशामुळे मिळाली प्रेरणा?

Career pathways derived from the teaching of hard work | कठोर परिश्रमांच्या शिकवणीतून मिळाली करिअरची वाट

कठोर परिश्रमांच्या शिकवणीतून मिळाली करिअरची वाट

Next

पालघर : शिकण्यापेक्षा मैदानी खेळाकडे माझा जास्त कल. त्यामुळे शाळा - कॉलेजमध्ये एक सर्वसाधारण मुलगा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असताना घरात त्यांनी एसपी (पोलीस अधीक्षक) बनावे हे वडिलांचे स्वप्न! इंजीनिअरिंगपर्यंत पोचल्यानंतर शिक्षणाचा पुढचा मार्ग खडतर बनू पाहत असताना अनेक संकटावर मात करीत जगण्यासाठी संघर्ष करणाºया एका व्यक्तीवर आधारित ढ४१२४्र३ ङ्मा ँंस्रस्र्रल्ली२२ या सत्य घटनेवर आधारित चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि जगण्यासाठी करावा लागणाºया संघर्षाचे वास्तव मला पटले. यूपीएससी परीक्षा पास करायची असेल तर कठोर परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव झाली आणि यातूनच पोलीस अधीक्षक गौरव सिंग यूपीएससी परीक्षा पास झाले.

अनेक संकटावर मात करीत जगण्यासाठी संघर्ष करणाºया ख्रिस गार्डन या नायकावर आधारित ‘परस्युएट आॅफ हॅप्पीनेस’ हा चित्रपट मी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात पाहिला आणि याने माझी मानसिकता संपूर्णपणे बदलून गेली. विविध समस्यांवर मात करीत जगण्यासाठी स्वत:चे रक्त विकून शेवटी यशस्वी होणाºया ख्रिसच्या व्यक्तिरेखेने मी चांगलाच प्रभावित झालो. जे लोक आयुष्यात काही करू शकत नाहीत ते नेहमीच आपले मनोधैर्य खच्ची करत असतात. त्यामुळे ‘जी स्वप्ने तू पाहिली आहेस, ती तुलाच पूर्ण करावी लागतील’. या ख्रिसने आपल्या मुलाला दिलेल्या शिकवणीतून मलाही धडा मिळाला आणि मी माझ्या वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.

कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही
वडील पोलीस खात्यात सबइन्स्पेक्टर पदावर कार्यरत असल्याने आपल्या मुलाने पोलीस अधीक्षक बनावे ही वडिलांची इच्छा. मात्र यूपीएससी परीक्षा पास करायची असेल तर अभ्यासात कठोर परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव मला इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात झाली. त्यानंतर मात्र मी आपले ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करण्यात अजिबात कसर सोडली नाही.

लखनऊच्या कुशीनगर सरकारी शाळेतून माझा शिक्षणाचा प्रवास सुरु झाला. सिटी मोंटेसरी शाळेतून माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवताना दहावी परीक्षेदरम्यान यूपीएससी परीक्षा देऊन पोलीस सेवेत जायचे ध्येय मी निश्चित केले. पुढे इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. वर्गात एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून माझी गणना होत होती. मात्र, शिकण्यापेक्षा मैदानी खेळ आणि व्यायाम याकडे माझा विशेष कल होता.

शिक्षकांपासून दोन हात लांब
शिक्षकांबद्दल मनात नितांत आदर असला तरी शिकण्यापेक्षा मला मैदानावर खेळणे अधिक पसंत होते. पण ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे अनेक शिक्षक समजावून सांगत असत. त्यांच्याकडून वारंवार मिळणारी ही शिकवण योग्य असली तरी खेळाकडे जास्त कल असल्याने मला ती त्रासदाय वाटायची आणि मी शिक्षकांपासून दोन हात लांब राहणेच पसंत करायचो. शाळेत माझे एकमेव आवडते शिक्षक म्हणजे पिटीचे सर बी.बी. सिंग.

आपली स्वप्ने आपल्यालाच पूर्ण करावी लागतात

Web Title: Career pathways derived from the teaching of hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.