शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-वडोदरा रस्त्याच्या बैठकीवर बहिष्कार

By admin | Updated: May 20, 2017 04:56 IST

मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता सक्षम अधिकारी तथा वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर

- लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता सक्षम अधिकारी तथा वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपल्या कार्यालयात विविध खात्याचे प्रमुख व बाधित शेतकरी यांची बैठक बोलावली होती. मात्र खुद्द सक्षम अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला. ठाणे व पालघर जिल्हयÞातील आठ तालुक्यातून मुंबई- वडोदरा व्हाया पनवेल हा राष्ट्रीय महामार्ग जात असून यात शेकडो शेतकरी बाधित होणार आहेत. वाडा तालुक्यातील केळठण, गोराड व निंबवली या तीन गावाच्या हद्दीतून हा महामार्ग जात असून यात अनेक शेतकरी बाधित होणार आहेत. तसेच निंबवली येथील ३० घरे, गोराड चार व केळठण ६ अशी घरेही महामार्गात जात असून अनेक जण त्यात बेघर होणार आहेत. याशिवाय बाजारहाट, दवाखाना, शाळा व कामधंद्यानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्यांचा मार्गही बंद होणार आहे. निंबवली येथे दोन विहिरी, पाच कूपनलिका दोन तलाव व पाणी पुरवठा योजनाही या मार्गाने बाधित होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांची सुपिक जमीन जाणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहे. गरम पाण्याचे झरे या महामार्गात जात असून पाण्याचे प्रवाह बंद होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. या महामार्गा संदर्भात चर्चा करण्यासाठी व जमीन मोजणीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपल्या कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांसह तालुक्यातील विविध खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा मार्ग आम्हाला नको आहे अशी स्पष्ट भूमिका शेतकरी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी यावेळी मांडली. शेतकऱ्यांची भूमिका ठामसक्षम अधिकारी आज भिवंडी निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे टाळले. मुंबई वडोदरा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार यांनी अनौपचारिक चर्चा करण्याचे सांगितल. शेतकऱ्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करून बहिष्कार घालण्याबाबत ठाम राहिले. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.