शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

लोकांसाठी खड्डे बुजविले नाहीत, पण व्यावसायिक गरब्यासाठी भाईंदरमध्ये अंथरले 'कार्पेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 7:26 PM

शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असताना व्यावसायीक नवरात्रीसाठी पालिकेची विशेष मेहेरबानी

मीरारोड - शहरात सर्वत्र खडड्डड्यांचे साम्राज्य पसरले असुन खडड्डड्याने एका तरुणाचा बळी घेतला. शहरातील रस्त्यांवरचे खड्डे कायम असताना मीरा भार्इंदर महापालिकेने मात्र एका खाजगी नवरात्री साठी चक्क भरपावसात बेकायदेशीरपणे डांबरी रस्ता बनवण्याचे काम केल्याने नागरीकां मध्ये संतापाचे वातावरण आहे. तर ठेकेदार व अधिकारायांवर कारवाईची मागणी मनसेसह नागरीकांनी केली आहे.भाईंदर पश्चिमेला उड्डाणपुला खालून मीरारोडच्या दिशेला जाणाराया रस्त्यावर फारशी लोकवस्ती नसुन वर्दळ देखील नाममात्र असते. तरी देखील पालिकेने काही वर्षां पुर्वी येथे डांबरी रस्ता बनवुन ठेवला आहे. आता या ठिकाणी ईस्ट वेस्ट फाऊंडेशन, सेव्हन इलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज, लिना ग्रुप आदींच्या माध्यमातुन लोटस नावाने नवरात्रीचे आयोजन केले गेले आहे. या ठिकाणी मोठमोठे कलाकार आणले जाणार असुन नवरात्रीच्या आड राजकिय प्रसिध्दीचा दांडिया देखील रंगणार आहे.दरम्यान महापालिकेने या राजकिय वरदहस्त असलेल्या हाईप्रोफाईल नवरात्री साठी या ठिकाणी असलेला जुना रस्ता न खोदताच आहे त्या रस्त्यावर चक्क खडी आदी टाकुन रस्ता उंच केला आहे. खडीवर डांबर टाकण्यात आले. वास्तविक पावसाळा सुरु असताना त्या ठिकाणी खडी व डांबराचा वापर करुन रस्ता बनवणे चुकीचे आहे. कारण डांबर पावसात टिकत नाही. पण पालिकेने मात्र पॅचवर्कच्या नावाखाली चक्क रस्ताच नवरात्रीसाठी बनवुन दिला आहे.शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहे. खडड्डड्याने एका तरुणाचा बळी जाऊन त्याचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. खडड्डड्यां मुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीला आले आहेत. पण रहदारीच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेला दिसत नसताना आड मार्गाला असलेल्या रस्त्यावर होणाराया बड्या राजकिय व व्यावसायीक नवरात्रीसाठी मात्र पालिकेने लाल गालीचा अंथरला आहे. महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर, शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी प्रतिक्रीयेसाठी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. पालिका सुत्रांनी मात्र खड्डे पडले होते म्हणुन रस्ता बनवल्याची सारवा सारव केली आहे.या प्रकरणी मनसेचे गणेश बामणे यांनी पालिकेवर टिकेची झोड उठवली आहे. सर्वसामान्य नागरीकांचे जीव खड्ड्याने जात असताना पालिकेला मात्र त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. शहरभर खड्डे पडले असताना तेथे मात्र पावसाचे कारण दिले जाते. आणि येथे मात्र महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबियांशी संबंधित असलेल्या संस्था - कंपनीच्या खाजगी व्यावसायीक नवरात्रीसाठी मात्र रस्ताच बनवुन दिल्याचे सांगत बामणे यांनी निषेध केला आहे. येथील पदपथावर गरीबांनी अतिक्रमण झाले म्हणुन भरपावसात झोपड्या तोडता मात्र आयोजकांनी पदपथावर अतिक्रमण केलेले पालिकेला दिसत नाही का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या सरीता नाईक यांनी केला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकNavratriनवरात्री