शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या जमिनीची चौकशी कोकण आयुक्त करणार

By admin | Updated: January 7, 2016 00:23 IST

मीरारोडच्या एस. के. स्टोन परिसरातील सर्व्हे क्र. ४७८ व ४८१ वरील सुमारे १८ एकर शासकीय जमिनीवर खाजगी विकासकांनी केलेल्या कब्ज्यासह पालिकेने

राजू काळे, भार्इंदरमीरारोडच्या एस. के. स्टोन परिसरातील सर्व्हे क्र. ४७८ व ४८१ वरील सुमारे १८ एकर शासकीय जमिनीवर खाजगी विकासकांनी केलेल्या कब्ज्यासह पालिकेने त्यांना दिलेल्या विकासाच्या परवानगीची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने कोकण विभागीय आयुक्तांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल्याने लवकरच सत्य समोर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या १७ वर्षांहुन रखडलेल्या या जमिनीवरील विकासाला राजकीय पुशअप मिळाल्याने त्यावरील विकासाचा मार्ग मोकळा होऊन त्या जमिनीच्या विकासापोटी पालिकेला सुमारे दीड लाख चौरस फुट क्षेत्रात भव्य पालिका मुख्यालय मोफत विकसित करण्याची तडजोड करण्यात आली आहे. या जमिनीवर होणारा खाजगी विकास हा बेकायदेशीर असून मुळात ही जमीनच शासकीय असल्याची तक्रार शिवाजी माळी या व्यक्तीने सरकारी पोर्टलवर २३ नोव्हेंबर २०१५ रोजी दाखल केली आहे. तत्पूर्वी या जमिनीवर नियोजित असलेल्या पालिका मुख्यालयाचा भुमीपूजन सोहळा २४ आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडला होता. तो उरकण्याअगोदरच मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १९ आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करुन त्या जमिनीवरील विकासाला क्लिन चीट दिल्याचे समोर आले आहे. तद्नंतरच मुख्यमंत्र्यांनी भुमिपूजनाला हजेरी लावल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. गेल्या २० वर्षांपासून कोणताही बोजा न दाखविता या जमिनीला अकृषिक (एनए) दाखला तब्बल तीनवेळा महसूल विभागानेच दिल्याचे समोर आले असून त्याचा कर भरण्याकरीता संबंधित विकासकांना सतत डिमांड नोटीसा पाठविल्या जात असतानाही त्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पालिकेने दिलेल्या परवानगीवर बोट ठेवून जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी प्राप्त तक्रारीनुसार त्या जमिनीवरील विकासाला स्थगिती दिली असून त्याची सुनावणी ११ जानेवारीला आयोजिली आहे.