शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

वाघ प्रकल्पाचा फायदा कमी; तोटा जास्त

By admin | Updated: October 6, 2015 23:18 IST

मोखाडा शहर व लगतच्या गावपाड्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून १९९४ मध्ये वाघ नदीवर पळसपाड्याजवळ मोठे धरण बांधण्यात

मोखाडा : मोखाडा शहर व लगतच्या गावपाड्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून १९९४ मध्ये वाघ नदीवर पळसपाड्याजवळ मोठे धरण बांधण्यात आले. मात्र, आजपर्यंत या धरणाचा फायदा किती हा प्रश्न कायमच आहे.१२ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही या धरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळालेला नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला. न्यायालयीन प्रक्रियेचा अडथळा आल्याने त्यांच्या हाताला अद्याप काही लागलेले नाही. यामुळे संताप व्यक्त होत असून अनेक आदिवासी शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत.मोखाडा शहरापासून ४ ते ५ किमीच्या अंतरावर असलेल्या या धरणात मुबलक स्वरूपात पाणी आहे. पाण्याचा पाट जेथपर्यंत आहे तेथपर्यंत गळती लागली असल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन ओलीताखाली राहत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या धरणाच्या मुख्य उद्देश साध्य झाला नसून फायदा कमी व तोटाच जास्त झाला आहे. अजूनपर्यंत या पाटाचे काम पूर्ण झाले नसल्याने शेवटच्या पाड्यापर्यंत पाणी पोहचले नसून पर्यायी मोठे ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ मात्र कायम आहे.या धरणासाठी करोडोंचा खर्च झाला असून आजही दुरूस्तीच्या नावाखाली तो सुरूच आहे. परंतु या धरणाचे कामकाज सुरळीत झाले असते तर नक्कीच मोखाडावासीयांचा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत झाली असती परंतु या शासनाच्या हलगर्जीमुळे व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षीत कारभारामुळे या वाघ प्रकल्पाचा फायदा कमी तोटाच जास्त झाला आहे.(वार्ताहर)