शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर पालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा

By admin | Updated: December 16, 2014 22:46 IST

या शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढलेली असतांनाही बदलापूर पालिकेला शासनाने ‘अ’ वर्गाचा दर्जा दिलेला नव्हता.

संकेत सबनीस, बदलापूरया शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढलेली असतांनाही बदलापूर पालिकेला शासनाने ‘अ’ वर्गाचा दर्जा दिलेला नव्हता. या प्रकरणी आमदार किसन कथोरे आणि बदलापूर पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी ठराव करुन शासनाकडे अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. अखेर या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याने आता बदलापूर पालिकेला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असून या संदर्भातील अध्यादेश लवकरच निघणार आहे. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद ही ‘ब’ वर्ग नगरपरिषद होती. त्यामुळे विषय समितीला असलेले अधिकार या पालिकेत कमी प्रमाणात होते. तसेच नव्याने कर्मचा-यांची भरती देखील करता येत नव्हती. सर्वात जलद गतीने वाढणारे शहर म्हणून बदलापूर शहराची ओळख आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता बदलापूर पालिकेला ‘अ’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळणे गरजेचे होते. तसेच २०११ च्या जनगणनेचा विचार करता बदलापूर शहराची लोकसंख्या ही १ लाख ७८ हजाराच्या वर आहे.‘अ’ वर्ग नगरपरिपरिषदेसाठी आवश्यक असलेली १ लाख ७५ हजारांची लोकसंख्या ओलांडलेली असतांनाही शासनाने या पालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा दिला नव्हता. आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर पालिकेला लोकसंख्येच्या आधारावर आणि वाढत्या शहरीकरणाच्या आधारावर अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने राजन घोरपडे, वामन म्हात्रे आणि राम पातकर यांनी पुढाकार घेत पालिकेत ठराव करुन तो ठराव शासनाकडे पाठविला होता. मात्र या प्रस्तावावर राज्य शासनाने निर्णय न घेतल्याने आगामी पालिकेची निवडणूक ही ब वर्ग दर्जा प्रमाणेच होण्याची शक्यता निर्माण झाली होती. (प्रतिनिधी)