शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दुर्दशा कायम!

By admin | Updated: April 6, 2016 01:52 IST

वर्गखोल्याची कमतरता, शौचालयाची वानवा, निकृष्ट जेवण तर याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष हे चित्र आहे जव्हार, मोखाडा व विक्रमगड येथील जव्हार प्रकल्प कार्यालयामार्फत चालणाऱ्या आश्रमशाळांचे

रविंद्र साळवे, मोखाडामोखाडा : वर्गखोल्याची कमतरता, शौचालयाची वानवा, निकृष्ट जेवण तर याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष हे चित्र आहे जव्हार, मोखाडा व विक्रमगड येथील जव्हार प्रकल्प कार्यालयामार्फत चालणाऱ्या आश्रमशाळांचे. नुकताच जव्हारमधील २६ विद्यार्थ्यांवर पाचगणीच्या आश्रमशाळेत झालेला अन्याय उघड झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वास्तवाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. यापूर्वीही कॅग व टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल स्टडिजने जव्हार प्रकल्पांतर्गत येणाऱ्या निवासी शिक्षणाचा भांडाफोड केला होता हे विशेष!जव्हार आश्रमशाळा प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ३० आश्रमशाळा चालवल्या जात आहेत. यामध्ये ९ हजार ४८२ मुले व ८ हजार ६८७ मुली एकूण १८हजार ६८७ शिक्षण घेत आहेत. परंतु या आश्रमशाळामध्ये शौचालय आणि बाथरूमचा फक्त डोलाराच उभा आहे. प्रत्यक्षात आंघोळ व शौचविधी उघड्यावर होत आहेत. पैकी अनेक आश्रमशाळेना खोल्याची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना जेवण, झोपणे आणि शिक्षण एकाच खोलीत घ्यावे लागत आहे. तसेच अनेक आश्रमशाळांमध्ये घाणीचे साम्राज्य व कोंदट वास यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच आश्रमशाळेतील अधिक्षक व अधिक्षिका याची २८ रिक्तपदे अजून न भरल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा आहे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.पिण्यासाठी अशुद्ध पाणी, आश्रमशाळेत प्रयोगशाळा व संगणकाचा आभाव, नादुरस्त पंखे, रात्रीचा विजेचा लपंडाव व आरोग्य तपासणीचा आभाव हे येथील शिक्षणाचे वास्तव आहे. दुर्गम भागात नियमित तपासणी होत नसल्याने व्यवस्थापकांची मनमानी या सर्व प्रकारामुळे गत पाच वर्षात ५७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक आश्रमशाळा, दुरावस्थेत खितपत पडल्या आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत १६ आश्रमशाळाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून घानवळ येथील आश्रमशाळा आजही भाड्याच्या घरात भरत आहेत. तसेच शिक्षकांनी निवासी थांबणे बंधनकारक असून अनेक आश्रमशाळेतील शिक्षक निवासी थांबत नाही. (वार्ताहर)