शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

अनिलकुमार पवार यांची ईडीकडून १० तास कसून चौकशी; वसई-विरारमधील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणी नोंदविला जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:44 IST

रात्री पावणे दहा वाजता ते पत्नीसह कार्यालयातून बाहेर पडले. गेल्या आठवड्यात ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केले होते. 

मुंबई : वसई-विरार परिसरात राखीव ६० एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या ४१ अनधिकृत इमारती प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची सोमवारी ईडीने सपत्नीक १० तास चौकशी करीत जबाब नोंदवला. ते त्यांच्या पत्नीसह ईडीच्या वरळी येथील सी. जे. हाउसमधील कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता दाखल झाले. 

रात्री पावणे दहा वाजता ते पत्नीसह कार्यालयातून बाहेर पडले. गेल्या आठवड्यात ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केले होते. 

अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनिलकुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणात त्यांनी प्रति चौरस फूट २० ते २५ रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात आढळून आले. तर पालिकेचे तत्कालीन नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी प्रति चौरस फूट १० रुपये दराने ४१ इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच यात कनिष्ठ अभियंते, वास्तुविशारद, सनदी लेखापाल आणि अनेक एजंटदेखील सहभागी आहेत. या प्रकरणी मीरा-भाईंदर पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी २९ जुलै रोजी अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी १ कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. अनिलकुमार पवारांच्या नातेवाइकांच्या नावे आढळलेली बेनामी मालमत्तेची कागदपत्रेदेखील अधिकाऱ्यांनी जप्त केली. 

ईडीने यापूर्वी या प्रकरणात गुंतलेल्या लोकांवर केलेल्या छापेमारीत ८ कोटी ९४ लाख रुपये, २३ कोटी २५ लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने, १३ कोटी ८६ लाख रुपयांचे शेअर्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, बँकेतल्या ठेवी जप्त केल्या आहेत. मंगळवारीही अनिलकुमार यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय