शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त मच्छीमारांनी बार्जला पिटाळले

By admin | Updated: March 17, 2016 02:39 IST

तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड

- हितेन नाईक,  पालघरतारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधून प्रदुषीत रासायनिक सांडपाण्याचे पाईप नवापूर गावाच्या समोरील समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याच्या कामासाठी आलेल्या एमटीसी टाईड या कंपनीच्या बार्जला दांडी गावातील मच्छीमारांच्या बोटीनी समुद्रात घेराव घातला. आणि त्यांना पिटाळून लावले. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही समुद्रात गेल्या होत्या.तारापुरच्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामधून बाहेर निघणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) नवापूर गावातून पाईप लाईनद्वारे समुद्रात सोडले जात होते. या मागील चाळीस वर्षापासून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन जुनाट व नादुरूस्त झाल्याने एमआयडीसीने ही जुनाट पाईपलाईन बदलून त्या जागी नवीन एचडीपीई पाईप लाईन समुद्रात ७.१ कि. मी. अंतरावर टाकण्याचे काम हाती घेतले होते. याद्वारे समुद्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मच्छीमारीचा गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा मत्स्य संपदेचा भाग नष्ट होणार असल्याने मच्छीमारांचा या कामाला विरोध होता. नवापूर ग्रामपंचायतीने लाखो रू. चा विकास निधी स्वीकारून आपल्या गावातून या पाईपलाईन टाकण्यास परवानगी दिल्याने किनारपट्टीवरील मच्छीमार गावामधून संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. दि. २७ फेब्रुवारी रोजी उच्छेळी-दांडी येथील शेकडो पुरूष महिलांनी नवापूर गावासमोरील समुद्रावर पाईपलाईन टाकण्याचे काम बंद पाडले होते. यावेळी नवापूर व उच्छेळी-दांडीच्या ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. तर या प्रदूषित पाण्याच्या पाईपलाईनमुळे भविष्यात निर्माण होणारे पर्यावरणाचे दुष्यपरीणाम पाहता हे काम बंद करण्यासाठी अनेक अर्ज विनंत्या करूनही हे काम थांबत नसल्याने काही अज्ञात व्यक्तींनी पाम येथे रस्त्यावर टाकलेले पाईप पेटवून दिले असावेत अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सातपाटी सागरी पो. स्टे. मध्येही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या मच्छीमार किनारपट्टीवर जिंदाल, वाढवण हे बंदर प्रकल्प स्थानिकांवर लादले जात असतांना एमआयडीसीमधून थेट समुद्रात प्रदूषित पाण्याची पाईपलाईन सोडल्याने आधीच मत्स्य दुष्काळाच्या खाईत होरपळत असलेल्या मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येईल. त्यामुळे मच्छीमार संतप्त झाला असून आज नवापूर गावासमोरील समुद्रात अंधेरी येथील एमटीसी टाईड या कंपनीचा बार्ज पाईप टाकण्याचे काम हाती घेत असल्याचे कळल्यानंतर उच्छेळी-दांडीच्या मच्छीमारांनी आपापल्या बोटी थेट समुद्रात नेल्या. सुधीर तामोरे, विजय तामोरे, विद्याधर केणी, राजीव पागधरे, रोहीदास तामोरे, इ. सह रणरागिणी बनलेल्या संगीता अक्रे इ. व शेकडो महिलांनी या बार्जला पिटाळून लावले.