७२ वर्षांचा अत्याचारी पळाला

By Admin | Updated: October 11, 2016 02:40 IST2016-10-11T02:40:10+5:302016-10-11T02:40:10+5:30

वालीव येथील एका अल्पवीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणारा ७२ वर्षी आरोपी अमेरिकेला फरार झाला आहे.

72 years of persecution ran | ७२ वर्षांचा अत्याचारी पळाला

७२ वर्षांचा अत्याचारी पळाला

विरार : वालीव येथील एका अल्पवीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणारा ७२ वर्षी आरोपी अमेरिकेला फरार झाला आहे.
येथील एका अल्पवीन मुलीवर येथील मार्टिन लोपीस या ७२ वर्षी वृद्धाने बलात्कार केल्याचा आरोप करून पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असलेली ही मुलगी गरोदर राहिली आहे. तीने पोलीस ठाण्यात तक्रार करू नये यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, या दबावाला बळी न पडता तीने तक्रार केल्यामुळे मार्टीन अमेरिकेला फरार झाला आहे. त्याला अमेरिकेतून कसे ताब्यात घ्यायचे या पेचात पोलीस सापडले आहे. ही प्रक्रीया खुप क्लिष्ट असल्याची चर्चा आहे.

Web Title: 72 years of persecution ran