शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात ८ महिन्यांत ६१ बलात्कार

By admin | Updated: October 2, 2016 03:07 IST

वसई तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बलात्काराचे ६१ आणि विनयभंगाचे ७९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे तुळिंज पोलीस

विरार : वसई तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत बलात्काराचे ६१ आणि विनयभंगाचे ७९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे तुळिंज पोलीस ठाण्यात घडले आहेत. त्यामुळे वसईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वसई तालुक्यातील विरार, नालासोपारा, तुळिंज, वालीव, माणिकपूर, अर्नाळा, वसई या पोलीस ठाण्यांच्या परिसरात विनयभंग आणि बलात्काराच्या घटना वाढू लागल्याने महिला, मुली असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जानेवारी २०१६ ते आॅगस्ट २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत विनयभंगाच्या ७९ आणि बलात्काराच्या ६१ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीही वासनेला बळी पडल्या आहेत. काही घटनांमध्ये महिला आणि मुलींना त्यांचा विश्वास संपादन करून, एकांतात नेऊन, जेवणात आणि शीतपेयात गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्याच्या घटना घडल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही आरोपी फरार झाले आहेत. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.वसई पोलीस ठाण्यात २, विरारमध्ये ९, माणिकपूरमध्ये ४, नालासोपाऱ्यात ३, वालीवमध्ये १४, तुळिंजमध्ये २४ आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात ५ मिळून बलात्काराचे एकूण ६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ गुन्हे घडले आहेत. (वार्ताहर)