शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या ठेवीदारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 19, 2014 23:52 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली आहे. यातून बँकेला वर काढण्याकरिता शासनाच्यावतीने १०२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे; ही मदत जाहीर करण्यात आली असली तरी ती देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे.

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली आहे. यातून बँकेला वर काढण्याकरिता शासनाच्यावतीने १०२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे; ही मदत जाहीर करण्यात आली असली तरी ती देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. यामुळे ठेविदारांच्या बँकेतील रकमा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे, असा आरोप करीत मंगळवारी ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.दुपारी १२ वाजता रेल्वे स्थानकासमोर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून ठेवीदारांचा मोर्चा निघाला. या मोर्चात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व मध्यवर्ती बँकेच्या ठेवीदारांनी सहभाग नोंदविला होता. हा मोर्चा बजाज चौक, आंबेडकर चौक या मार्गे आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी एका एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून बँकेला वाचवून ठेविदरांच्या रकमा परत करण्याची मुख्य मागणी केली आहे. गत दोन महिन्यांपासून बँकेला जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजची रक्कम अद्याप देण्यात आली नाही. सदर प्रकरण न्यायालयात आहे. यात बँकांना मदत करण्याकरिता न्यायालयाच्यावतीने २१ आॅगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. यात बँकेला तर मदत मिळाली तर ठेवीदारांच्या रकमा वाचतील.न्यायालयाचा निकाल जर रिझर्व बँकेच्या बाजूने लागला तर बँकेतील खातेदारांच्या रकमा बुडल्याशिवाय राहणार नाही. ठेवीदारांची रक्कम वाचविण्याकरिता ठेवीदारांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात तिसरा पक्ष म्हणून ठेवीदारांनी याचिका दाखल केली आहे. २१ आॅगस्ट रोजी येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या मोर्चात किसान अधिकार अभियानच्या पदाधिकारी आणि सदस्यांसह बँकेचे ठेवीदार व शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)