शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

यंदा लक्ष्मीपूजनाला मुकले पांढरे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

लक्ष्मीपूजनच्या वेळेस कापसाची आणि सोयाबीनची मोठ्या श्रध्देने पूजा केली जाते. तसेच भरघोस उत्पन्नासाठी देवाला साकडेही घातले जातात. मात्र यावर्षी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने कापसाशिवायच लक्ष्मीपूजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे शेतकºयांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसून आले.

ठळक मुद्देपावसाचा फटका : शेतकरी नैराश्यात तर व्यावसायिक अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पोळा आणि दिवाळी हे सण आनंदाचे व महत्वाचे मानले जातात. दिवाळीला खरीप हंगामातील उत्पन्न घरी येत असल्याने लक्ष्मीपूजनच्या वेळेस कापसाची आणि सोयाबीनचीमोठ्या श्रध्देने पूजा केली जाते. तसेच भरघोस उत्पन्नासाठी देवाला साकडेही घातले जातात. मात्र यावर्षी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने कापसाशिवायच लक्ष्मीपूजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे शेतकºयांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसून आले.यावर्षी पावसाच्या वक्रदृष्टीने सोयाबीन उशिरा कापणीला आले आणि कपाशीची तर हल्ली शितादही सुध्दा झाली नसल्याने लक्ष्मीपूजनाला कापसाचे एक बोंडही शेतकऱ्यांच्या घरी आले नाही. चिकणीसह परिसरातील बºयाच शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच आहेत. काहींचे ढिग लागून तर काहींची कापणी सुरू आहेत. बºयाच शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच कापणीच्या प्रतिक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आलेत अशा शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात विकून दिवाळी साजरी केलीत.पण; ज्यांचे सोयाबीन शेतातच आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र उसनवारी घेऊन दिवाळी साजरी करावी लागली. शेतकऱ्यांचे पीक न निघाल्यामुळे बाजारपेठेतील व्यावसायीकांनाही त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या दिवाळीत कापड, किराणा दुकानात विशेष गर्दी दिसत नव्हती. यामुळे व्यावसायीक सुध्दा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.दरवर्षी दिवाळीच्या तीन दिवसा अगोदरच ग्राहकांची रीघ लागायची परंतु; यावर्षी मात्र तसे काही घडले नाहीत. शेतकºयांचे पीक न निघाल्यामुळे आम्हाला चांगलाच फटका बसला.- राजेश गांधी, किराणा व्यावसायिक, देवळी.शेतकºयांच्या भरवशावर आमचे व्यवसाय आहेत. शेतकऱ्यांचे पीकच निघाले नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्केही व्यवसाय झाला नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ग्राहकही नगण्यच होते.- राजु कपुर, कापड व्यावसायिक, देवळी.

टॅग्स :agricultureशेती