शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कपाशीचा पेरा वाढणार

By admin | Updated: June 16, 2014 23:39 IST

गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून

अरुण फाळके - कारंजा(घा)गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून यावर्षी सोयाबीन पेक्षा, कपाशीचा पेरा जास्त करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तसेच सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच ती वापरा, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. कारंजा तालुक्यातील ३५ कृषी सेवा केंद्र बियाणे व खतांचा साठा करून विक्रीसाठी सज्ज झालेली आहेत. यावर्षी तालुक्यातील ४२ हजार ५०० हेक्टर जमीन खरीप हंगामासाठी लागवडीखाली येणार आहे. यात २५००० हेक्टरमध्ये सोयाबीन, ९५०० हेक्टरमध्ये कापूस, १ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, ६५०० हेक्टरमध्ये तूर, ३०० हेक्टरमध्ये भूईमुंग, तर २०० हेक्टरमध्ये इतर पिके घेतली जाणार असल्याचा अंदाज व नियोजन आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प झाले. सुरवातीला भाव मिळाला नाही. परिणामी यावर्षी सोयाबीन पेक्षा कपाशीचा पेरा जास्त करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे निकोप बियाणे सुद्धा तयार होवू शकले नाही. काही व्यापाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून, राज्यातून बियाणे आणून, शेतकऱ्यांसाठी विकण्यास उपलब्ध केले आहे. पण या बियाण्यांच्या उगवण क्षमतेबद्दल कोणीही खात्री द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून घेतलेले असो वा घरचे बियाणे असो पुढील धोका व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उगवण क्षमता आपल्या घरी तपासूनच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने जाहिररित्या करण्यात आले आहे.मागील वर्षी नापिकीमुळे त्रस्त झालेला शेतकरी हे महागडे बियाणे घेवू शकत नसल्यामुळे खासगीतून कमी दराचे सुटे बियाणे तो विकत घेत आहे. ६० ते ७० रूपये किलो असा खासगी बियाण्यांचा दर आहे. बँकांनी अद्याप क्रॉप लोन प्रकरणे मंजूर केलेली नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने क्रॉप लोन उपलब्ध करून द्यावे तसेच गारपीट व अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या किमान अल्पभूधारकांना तरी शासनाने विनामूल्य बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच पीककर्ज त्वरीत देण्यासाठी बँकांवर दडपण आणावे. असा आग्रह तालुक्यातील आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकऱ्यांनी धरलेला आहे. तालुक्यातील कृषी केंद्रात २५०० मेट्रीक टन रासायनिक खत, कपाशीच्या बियाण्याचे १५ हजार पॅकेट, व सोयाबीनचे पहिल्या टप्प्यात पुरेल येवढे बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकारी अनिल आदेवार यांनी दिली. पण बियाण्यांची उगवणशक्ती शेतकरी वर्गाने आधी तपासूनच नंतर पेरा करून दुबार पेरणीचा धोका टाळावा असे आवाहनही जिल्ह्यातील कास्तकारांना करण्यात आले आहे.