शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: October 5, 2016 01:41 IST

जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कृषी अधिकाऱ्यांचा राज्य संवर्गात समावेश करण्यात यावा,

सीईओंना निवेदन : जिल्हा परिषदेसमोर धरणेवर्धा: जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कृषी अधिकाऱ्यांचा राज्य संवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवून त्यांच्या पाठपुराव्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना निवेदन देण्यात आले. तसेच जि.प. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे देवून आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी हे पद राज्य शासन कृषी विभागाच्या आकृतीबंधातील आहे. सदर पद कृषी विभागातील मंडळ कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ) या पदाला समकक्ष आहे. या दोन्ही पदाची पदोन्नती तालुका कृषी अधिकारी या पदावर होते. वेतनश्रेणी सुद्धा सारखी आहे. शिवाय विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कृषी अधिकारी या पदास वर्ग-२ असा दर्जा देण्याबाबत शासनाला अनुकूल अभिप्राय दिलेला आहे; परंतु अद्यापही जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकाऱ्यांना राजपत्रित दर्जा देण्यात आला नाही. या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांनी सोमवारपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरही हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बमनोटे, सचिव मनोज नगापूरकर, उपाध्यक्ष सुनील मुरारकर, राजीव शेंडे, संजय राऊत, प्रशांत भोयर, दिवाकर मौजे तसेच तालुक्यातील इतरांनी यामध्ये सहभाग देवून आंदोलनाची व्याप्ती वाढविली आहे.(प्रतिनिधी)