शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील मजूर आले वर्ध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे.

ठळक मुद्देरोजगारासाठी स्थलांतरण : परिवार कापूस वेचणीत व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शंभरावर परिवार दाखल झाले असून कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्याने मजुरांचा प्रश्न आता सुटला आहे.खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे. अशातच हाताला काम नसलेल्या पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यासह इतरही भागातील मजूर कुटुंबीय सेवाग्राम नजिकच्या तुळजापूर गावासह जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या टोळ्या गावातच मिळेल त्यांच्याकडे आसरा घेऊन राहात असल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न मिटला असून कापूस वेचणीला जोर आला आहे. आता बाहेर जिल्ह्यातून आलेले मजूर सकाळपासूनच कामाला लागत असून त्यांना १४० रुपये मनकी (दहा किलो) मजुरी दिली जात असल्याने गावातील मजुरांचे दरही आवाक्यात आले आहेत. या मजुरांमुळे शेतकऱ्यांची अडचण बऱ्या प्रमाणात सुटली असून आता हे मजूर उलंगवाडी होईपर्यंत इकडेच वास्तव्यास राहणार आहे.शेतकरीच करतात राहण्याची व्यवस्थाविदर्भाच पांढर सोनं असलेल्या कापसाने यावर्षी शेतकºयांचे आर्थिक बजेटच बिघडविले आहे. यावर्षी पºहाटी पाच ते सहा फूट उंच वाढली असली तरी बोंडं मात्र वीसच्या आतच दिसून येत आहेत. त्यामुळे एक-दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असताना मजुरांच्या कमतरतेमुळे वाढीव दर देण्याचा भारही शेतकऱ्यांवर पडला आहे. रोजगाराच्या शोधात जिल्ह्याबाहेरील मजूर दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा हा भार कमी झाला आहे. बाहेरगावावरून आलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली तर काहींनी गावात पाल टाकून आसरा घेतला आहे.

टॅग्स :Labourकामगार