शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय कामगारांना पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:43 IST

बांधकाम कामगारांकडे राहायला स्वत:चे घर नसते. त्यांना कुठेतरी झोपड्या बांधून राहावे लागते. मात्र तेच मजबुत आणि

वर्धा : बांधकाम कामगारांकडे राहायला स्वत:चे घर नसते. त्यांना कुठेतरी झोपड्या बांधून राहावे लागते. मात्र तेच मजबुत आणि चांगल्या इमारतीचे बांधकाम करतात. आजही हे कामगार शासकीय सुविधापासून वंचित आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. संघटनांनी याकरिता प्रयत्न करीत आहे. संघटीत होऊन संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही, असे विचार शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.इमारत बांधकाम कामगारांच्या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सिटूचे जिल्हाध्यक्ष यशवंत झाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय मोहोड, गंगाधर कलवे, महेश दुबे, सिताराम लोहकरे, भैय्याजी देशकर, चंद्रभान नाखले, शरद पालांदूरकर, सुनील भदाडे यांची मंचावर उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक यशवंत झाडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले, बांधकाम कामगार हा विखुरलेला व असंघटीत आहे. त्याला कायद्याद्वारे सामाजीक सुरक्षा मिळत नाही. शासनाने इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन करून विविध सुविधा दिल्या. मात्र त्याचा लाभ घेताना संघर्ष करावा लागतो. जिल्ह्यात हजारो बांधकाम कामगारांनी शासनाकडे नोंदणी केली नाही. त्यांचेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे मत मांडले. या मेळाव्याप्रसंगी हिंगणघाट शहरात ज्या कामगारांनी विविध घरे बांधली त्या ज्येष्ठ कामगार मिस्त्रीचा सत्कार केला. मान्यवरांनी नामदेव जमलेवार यांना शाल, श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आली. तसेच अपंग बांधकाम कामगार संजय बोरकर यांचा सत्कार केला. यावेळी सिताराम लोहकरे, भैय्याजी देशकर, महेश दुबे, चंद्रभान नाखले यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला अरुण म्हसकर, नथ्थु धानोरकर, नरेश सातघरे, भास्कर चिरकुटे, वसंत गेडाम, विजय नारायणे, अनिल मसराम, दिलीप कुमरे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)