शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरीच्या पहिलेच निघाले ‘वर्क आॅर्डर’

By admin | Updated: August 24, 2014 00:09 IST

सन २०१२ ते २०१३ या कालावधीत वर्धा पालिकेत एकूण ३९ कामे झाल्याची नोंद नस्तीत करण्यात आली आहे. यात काही रस्त्याची, नाली व हातपंप लावण्याच्या कामाचा समावेश आहे. मात्र ही कामे

न.प.चा भोंगळ कारभार : १.३० लाखांच्या रस्त्याचे देयक १६.५० लाखांचे ंरूपेश खैरी - वर्धा सन २०१२ ते २०१३ या कालावधीत वर्धा पालिकेत एकूण ३९ कामे झाल्याची नोंद नस्तीत करण्यात आली आहे. यात काही रस्त्याची, नाली व हातपंप लावण्याच्या कामाचा समावेश आहे. मात्र ही कामे करताना पालिकेने पहिले वर्कआॅर्डर काढला व नंतर मंजुरी दिल्याचा खळबळजनक प्रकार अंकेक्षण अहवालातून समोर आला आहे. पालिकेत विविध निधीअंतर्गत करण्यात ३९ कामांची नोंद पालिकेच्या नस्तीत आहे. यात विविध कामांची निविदा अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा जास्त दराने मंजूर करण्यात आल्या आहेत. वाढीव दराने निविदा मंजूर करताना त्या कोणत्या कारणाने करण्यात येत आहे याची कुठलेही परीक्षण करण्यात आले नसल्याचे या अहवालात नमूद आहे. करण्यात आलेल्या अनेक कामांना मंजुरी नसताना त्यांचा वर्क आॅर्डर काढण्यात आल्याने ही कामे झाली अथवा नाही याचा खुलासा होत नाही. येथील मोहन विधानी ते देवघरे ते खराबे यांच्या घराचा रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या कामाकरिता तांत्रिक मंजुरी १६ आॅक्टोबर २०१० रोजी मिळली. हे काम करण्याचे आदेश मात्र २२ जुलै २००९ रोजी देण्यात आले आहे. पालिकेची मंजुरी मिळण्यापूर्वीच काम सुरू झालेल्या या रस्त्याकरिता पालिकेत एक लाख ३३ हजार ९७६ रुपयांची रक्कम प्रामणित असताना या कामाचे मुल्यांकन १६ लाख ५० हजार ६०७ रुपये निघाले. यामुळे या रस्त्याच्या कामात नेमका लाभ कुणाला झाला हे न सांगताच समोर येत आहे. असेच प्रकार अनेक रस्त्यात झाले आहेत. सात लाख रुपयांत घेतलेल्या कामाचे देयक दहा लाख रुपयांनी काढले. चार लाख रुपयाच्या कामाचे मुल्यांकन सरळ दुप्पट आठ लाख रुपये काढण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. याच काळात झालेल्या जामनारे ते गुरू वकील यांच्या घरापर्यंत झालेल्या नालीच्या कामाकरिता पालिकच्यावतीने एक लाख ६९ हजार रुपये प्रमाणित करण्यात आले होते. असे असताना या कामाचे मुल्यांकन दहा लाख रुपये काढण्यात आले. यात कंत्राटदाराचा दहा पटीने लाभ झाल्याचे समोर येत आहे. या व्यतिरिक्त अनेक कामात असेच प्रकार झाल्याचे अहवालात नोंद करण्यात आले आहे. प्रत्येकच कामात प्रमाणित कामाच्या दुप्पट व तिप्पट मुल्यांकन काढण्यात आले आहे. शिवाय पालिकेच्यावतीने ते मंजूरही करण्यात आले आहे. यामुळे पालिकेच्या कामाच्या माध्यमातून अनेक कंत्राटदारांनी त्यांच्या तिजोऱ्या भरल्याचे समोर येत आहे. या कामाचा दर्जा पालिकेने तपासला अथवा नाही या बाबत कुठलीही नोंद अहवालात नाही.