शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

महिला हिंसाचाराविरोधात शुक्रवारी सामूहिक आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

ज्या जिल्ह्यातून स्त्रियांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा जोपासण्याची सुरुवात झाली त्याच जिल्ह्यामध्ये प्राध्यापिकाला जाळून मारण्याची घटना घडणे ही बाब चिंतनाची आहे. त्यामुळेच आत्मचिंतन व श्रद्धांजली वाहिण्याकरिता शुक्रवार १४ फेब्रुवारीला महिला हिंसाचार विरोधी सामूहिक आत्मक्लेश उपवासाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीकांत बाराहाते यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री करणार १२ तास उपवास : श्रीकांत बाराहाते यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराला समृद्ध व चिंतनशील वारसा लाभला आहे. या जिल्ह्यातून काही मूल्यांचे संवर्धन राष्ट्रीय पातळीवर झाले आहे. ज्या जिल्ह्यातून स्त्रियांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा जोपासण्याची सुरुवात झाली त्याच जिल्ह्यामध्ये प्राध्यापिकाला जाळून मारण्याची घटना घडणे ही बाब चिंतनाची आहे. त्यामुळेच आत्मचिंतन व श्रद्धांजली वाहिण्याकरिता शुक्रवार १४ फेब्रुवारीला महिला हिंसाचार विरोधी सामूहिक आत्मक्लेश उपवासाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीकांत बाराहाते यांनी पत्रपरिषदेत दिली.स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत हा सामूहिक आत्मक्लेश उपवास होणार आहे. हिंगणघाट येथील घटनेने संवेदनशील नागरिकांच्या हृदयाला वेदना झाल्या आहेत. समाज म्हणून या घटनेच्या व यासारख्या राज्यातील, देशातील इतर घटनांच्या पार्श्वभूमीवर स्त्री-पुरुष समानता, लिंगभेदी हिंसा, स्त्री स्वातंत्र्य, प्रबोधन या सर्व प्रश्नांवर सामुहिक चिंतन करून हिंगणघाट, औरंगाबाद, मुंबई यासारख्या अनेक भिषण मानवता विरोधी घटनांच्या विरोधात सामूहिक उपवास, आत्मक्लेश करण्याकरिता समाजातील सर्व पक्षीय, सर्व सामाजिक, सांस्कृतिक, परिवर्तनवादी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदारही यात सहभागी होऊन बारा तास उपवास करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा चिंतनीय उपवास असून याचा उत्सव किंवा समारंभ होऊ नये याची काळजी प्रत्येकानी घेण्याची गरज आहे. या पत्रपरिषदेला किसान अधिकारी अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर व शहर अध्यक्ष सुधीर पांगूळ व शारदा झामरे यांची उपस्थिती होती.