भांडे विकणाऱ्या महिलांनी दागिने लांबविले

By Admin | Updated: December 6, 2014 22:54 IST2014-12-06T22:54:32+5:302014-12-06T22:54:32+5:30

भांडे विकण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या घरात शिरून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शनिवारी ११ वाजताच्या सुमारास गिरड येथे घडली.

Women selling the utensils extended ornaments | भांडे विकणाऱ्या महिलांनी दागिने लांबविले

भांडे विकणाऱ्या महिलांनी दागिने लांबविले

गिरड : भांडे विकण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या घरात शिरून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शनिवारी ११ वाजताच्या सुमारास गिरड येथे घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील उमा रामेश्वर कदम (५६) ही घरी एकटीच असताना दोन महिला भांडे विकण्यासाठी आल्या. त्यांनी भांडे घेण्यासाठी महिलांना थांबविले. महिलांनी जेवणासाठी पाणी मागितल्याने ती दोन-तीन वेळा घरात गेली, हिच संधी साधून त्यातील एका महिलेने उमा यांच्या घरातून आलमारीवर ठेवलेली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. महिला निघून गेल्यावर ही बाब लक्षात आला. यात १४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून गुन्हा दाखल आहे. (वार्ताहर)

Web Title: Women selling the utensils extended ornaments