पत्नीला मांजर बनविण्याची धमकी

By Admin | Updated: April 9, 2016 02:23 IST2016-04-09T02:23:09+5:302016-04-09T02:23:09+5:30

मागील सहा महिन्यांपासून मंत्रविद्या करीत असलेल्या पतीला खटकले असता त्याने पत्नीला मांजर बनविण्याची धमकी दिली.

Wife threatens to make a cat | पत्नीला मांजर बनविण्याची धमकी

पत्नीला मांजर बनविण्याची धमकी

मांत्रिक पतीविरुद्ध तक्रार : आरोपीला अटक
आष्टी (श.) : मागील सहा महिन्यांपासून मंत्रविद्या करीत असलेल्या पतीला खटकले असता त्याने पत्नीला मांजर बनविण्याची धमकी दिली. त्याच्या या वाढत्या प्रकाराला कंटाळून अखेर पत्नीने मांत्रिक पतीविरुद्ध शुक्रवारी आष्टी पोलिसात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी संजय महादेव इंदुरकर (५०) रा. अंतोरा याच्याविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, संजय इंदुरकर हा मागील सहा महिन्यांपासून दिल्ली येथे जाऊन काळ्या बाहुल्या आणायचा. प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला मंत्रविद्या करायचा. त्याने जादुटोण्याचे साहित्यही खरेदी केले होते. हा प्रकार त्याची पत्नी छायाला खटकत असल्याने ती त्याला टोकत होती. मात्र त्याचा हा अघोरी प्रकार सुरूच होता. त्याने पत्नीसह घरच्या मंडळींना मांजर बनवून वाईट अवस्था करण्याची धमकी दिली. तसेच या अघोरी कामात सहकार्य करण्यासाठी दबाबही टाकत होता. त्याच्या या कृत्याने त्रस्त झालेल्या छायाने शुक्रवारी पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. (प्रतिनिधी)

Web Title: Wife threatens to make a cat