शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची रुंदी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेल्या तीन मिटर रुंदीच्या रस्त्यांना यात प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले. एकूणच या योजनेच्या माध्यमातून अनेक ग्रामीण रस्ते गुळगुळीत होणार आहेत.

ठळक मुद्देग्रामीण मार्ग होणार गुळगुळीत : तिसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने केले जातेय नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागातील रस्ते गुळगुळीत होत नागरिकांना सुविधा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेल्या तीन मिटर रुंदीच्या रस्त्यांना यात प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले. एकूणच या योजनेच्या माध्यमातून अनेक ग्रामीण रस्ते गुळगुळीत होणार आहेत.प्राप्त माहितीनुसार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ९७७ कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्याच्या विषयाला मंजूरी मिळाली होती. त्या अनुषंगाने २४१.७० कोटींचा निधी प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्यात आली. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एकूण २६६.६६ कोटींचा निधी खर्च करून ९६० कि़मी.चे रस्ते बांधण्यात आले. तर याच योजनेच्या दुसºया टप्प्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रत्यक्ष काम करण्यात आले. दुसºया टप्प्यात ४१.९५ कि.मी.चे रस्ते बांधण्याच्या विषयाला वरिष्ठांकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर २५.११ कोटींचा निधी याविभागाला प्राप्त झाला.मंजूर कामापैकी शंभर टक्के म्हणजे ४१.९५ कि़मी.चे रस्ते २२.७२ कोटींचा निधी खर्च करून बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर सदर योजनेच्या तिसºया टप्प्यात करावयाच्या कामाचे प्रभावीपणे नियोजन सध्या केले जात आहे. तिसºया टप्प्यात ज्या ३ किंवा ३.७५ मिटरच्या रस्त्यांना दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या रस्त्यांचे साडेपाच मिटरपर्यंत रुंदीकरण तसेच मजबुतीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा