शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास रोखले कुणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST

कर्णकर्कश हॉर्न, तसेच फटाके फोडणारे सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत असली, तरी मागील १३ महिन्यांच्या काळात फटाके फोडणाऱ्या एकाही वाहनावर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आलेली नाही, तर म्युझिकल हॉर्न असलेल्या सुमारे १५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेकडून १३ महिन्यांत एकही कारवाई नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतुकीच्या नियमांची प्रभावी जनजागृती करण्यासह बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई केली जात आहे. असे असले, तरी काही तरुण धोकादायक पद्धतीने वाहने चालवित असल्याचे बघावयास मिळते. इतकेच नव्हे, तर फटाके फोडणारे सायलेन्सर वाहनाला बसविणे हे कायद्यान्वये गुन्हा ठरतो, पण अनेक वाहनांना असे सायलेन्सर असल्याचे वास्तव असून, त्यामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. असे असतानाही मागील १३ महिन्यांत वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकही फटाके फोडणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे फटाके फोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास रोखले कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्णकर्कश हॉर्न, फटाके फोडणारे सायलेन्सर, चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणे, दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट बसविणे हे मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा ठरतो. या नियमाला बगल देणाऱ्यांवर वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते, परंतु जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहरासह जिल्ह्यातील देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सेलू आदी मोठ्या शहरात वाहतूक नियमांना सर्रास बगल दिली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कर्णकर्कश हॉर्न, तसेच फटाके फोडणारे सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत असली, तरी मागील १३ महिन्यांच्या काळात फटाके फोडणाऱ्या एकाही वाहनावर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आलेली नाही, तर म्युझिकल हॉर्न असलेल्या सुमारे १५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

या कलमान्वये होतेय कारवाईकर्णकर्कश, तसेच म्युझिकल हॉर्न असलेल्या वाहनावर मोटर वाहन कायद्याच्या कलम ११९/१७७ अन्वये कारवाई केली जाते.फटाके फोडणारे सायलेन्सर बसविण्यात आलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्याच्या कलम १२०/१७७ अन्वये कारवाई केली जाते.एखादी व्यक्ती त्याच्या ताब्यातील वाहन धोकादायक पद्धतीने चालवित असल्यास, त्या व्यक्तीवर कलम १८४ अन्वये कारवाई केली जाते.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासह बेशिस्तांवर धडक कारवाई केली जात आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर प्राधान्यक्रमाने कारवाई करा, अशा सूचना आपण आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेच.- राजेश कडू, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस