शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारांची लाच घेताना कृषी सहायक एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: September 29, 2014 23:10 IST

आष्टी तालुका कृषी सहायक दिवाकर विश्वनाथ शेळके याला २० हजार रुपयांची लाच घेताना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी १२ वाजताच्या

वर्धा : आष्टी तालुका कृषी सहायक दिवाकर विश्वनाथ शेळके याला २० हजार रुपयांची लाच घेताना वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आर्वी येथे करण्यात आली. देशमुख इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला आष्टी तालुक्याच्या बोरखडी येथील मौजा क्रमांक १० मध्ये कृषी विभागाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेंतर्गत शेततळ्याचे काम करण्याचा कंत्राट फेब्रुवारी २०१४ ला मंजूर झाला होता. त्यांनी मे २०१४ पर्यंत १३८ घनमीटर खोदकाम जेसीबीने केले. या कामापोटी त्यांना ३ लाख १९ हजारांचा धनादेश १२ आॅगस्टला मिळाला होता. या धनादेशापोटी साडेपाच टक्केप्रमाणे दिवाकर शेळके याने देशमुख यांना ७५ हजार ९०० रुपयांच्या कमिशनची मागणी केली. शिवाय एम.बी.मध्ये १३ हजार ८०० घनमीटरपेक्षा जास्त कामाची नोंद घेतली असून तुम्हाला ९० हजारांचा जास्तीचे बिल मिळणार आहे, तेव्हा तुम्ही मला दोन्ही मिळून १ लाख ४८ हजार रुपयांची मागणी केली. यानंतर देशमुख यांनी ६ सप्टेंबरला शेळके यांना ३५ हजार दिले. त्यानंतर ९ हजार रुपये दिले आणि २९ सप्टेंबरला २० हजार रुपये देण्याचे ठरले. ते घेताना शेळकेला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,१३, १ ड प्रमाणे कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)