देवळीचा आठवडी बाजार नियमित सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:48+5:30

सोमवारी देवळी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीला नगराध्यक्ष सुचिता मडावी, जिल्हा न.प.प्रशासन अधिकारी एम.एम.शहा, तहसिलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, न.प.उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होते.

The weekly market of Deoli continues regularly | देवळीचा आठवडी बाजार नियमित सुरू ठेवा

देवळीचा आठवडी बाजार नियमित सुरू ठेवा

Next
ठळक मुद्देखासदारांची आढावा बैठक : अधिकाऱ्यांना दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शुक्रवारचा नियमीत चालणारा आठवडी बाजार गेल्या दोन महिण्यापासून बंद पडला आहे. त्यामुळे लहान मोठ्या व्यवसायिकांच्या रोजी रोटी वर संक्रात आली आहे. त्यामुळे हा आठवडी बाजार शुक्रवारला नियमीत भरविण्यात यावा. तसेच दररोजची गुजरी सुद्धा याच बाजारात भरविण्यात यावी, असे निर्देश खा. रामदास तडस यांनी दिले.
सोमवारी देवळी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीला नगराध्यक्ष सुचिता मडावी, जिल्हा न.प.प्रशासन अधिकारी एम.एम.शहा, तहसिलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, न.प.उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होते. पालिकेत नव्याने दाखल झालेल्या वेगवेगळ्या विभागातील कॅडर अधिकारी यांनी प्रशासनात चालविलेली मनमानी व कामातील अनियमीततेबाबत खासदारांनी रोष व्यक्त केला. या अधिकाºयांची विनापरवानगी गैरहजर राहण्याची प्रवृत्ती, नागरिकांसोबतची अरेरावी व कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी आदी गंभीर प्रकार उजेडात आल्याने पालिका प्रशासनाने संबधितांवर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी केली.
महसुल, आरोग्य, पोलीस विभागाने आपली जबाबदारी स्वीकारून कोरोनाचे संक्रमण काळात कामाची तत्परता दाखवावी अशा सुचना खासदारांनी केल्या. देवळीतील सर्व भागात दारूचा महापूर आला आहे. व्यवसायातील स्पर्धेतून अवैद्य दारूविक्रेत्यांचे गॅगवार होवू पाहत आहे. काही पोलीस शिपायांचे हात यात गुंतले असल्याचे बोलले जात असल्याने याची वेळीच दखल घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिले. काही कारण नसतांना न.प.चे कामचुकार अधिकारी व कर्मचारी रजेवर जात असेल तर अशांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यासोबतच त्यांचे वेतन थांबवून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात यावी. तसेच निर्जंतुकीकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ठरविण्यात आलेल्या रविवार ऐवजी गुरूवारी मोहिम राबविण्यात यावी.
रविवार हा दिवस व्यवसायाचा असल्याने दिवसाबाबतची दुरूस्ती करण्यात यावी अशा सुचना खा.तडस यांनी बैठकीत दिल्या. पालिका अधिकाºयांची चांगली झाडाझडती घेतली.

Web Title: The weekly market of Deoli continues regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.