शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

खरसखांडा गावात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 3, 2017 00:47 IST

तालुक्यातील खरसखांडा या गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. पिण्यासाठी व इतर वापरासाठी

कारंजा (घाडगे): तालुक्यातील खरसखांडा या गावात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाणी कुठून आणि कसे आणावे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. गावात असलेल्या सार्वजनिक विहिरीला पाणी नाही. याची माहिती शासनाला देण्यात आली असताना खाजगी विहिरी अधिग्रहणाचा निर्णय झाला नाही. यामुळे नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. खरसखांडा हे ६०० लोकसंख्येचे गाव. गावातील हँडपंप कोरडे झाले आहेत. नळयोजनेच्या विहिरी खोल करूनही अर्धा तासही पाणी टिकत नाही. गावाशेजारच्या सर्व विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्या आहेत. गावकऱ्यांची विशेषत: महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर दररोज ५०-६० महिलांचा मोर्चा येत आहे. ही पाणी समस्या सोडविणे ग्रामपंचायतीला शक्य नसल्यामुळे सरपंच विकास नासरे व गावकऱ्यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयावर धाव घेतली. टँकरमुक्त तालुका झाल्यामुळे पाण्याची व्यवस्था कशी करावी हा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर आहे. गतवर्षी एका खासगी शेतकऱ्याकडून पाण्यासाठी विहीर अधिग्रहीत केली होती. पण यावर्षी त्या विहिरीनेही तळ गाठला आहे. यामुळे शासनाने त्वरित लक्ष देत पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांची आहे.(तालुका प्रतिनिधी)