शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटली; पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

न.प. प्रशासनाचा संबंधीत बांधकाम कंत्राटदारावर वचक नसल्याने गेल्या आठवभरात जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडली. शिवाय त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण होत आहे. स्थानिक न.प. च्यावतीने साडेतीन कोटींच्या खर्चातून महादेवराव ठाकरे पुतळा ते न.प. माध्यमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूच्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे.

ठळक मुद्देआठवडाभरातील दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : रस्त्याच्या बांधकामात न.प. पाणी पुरवठा योजनेची दहा इंच व्यासाची पाईपलाईन फुटल्याने स्थानिक इंदिरा गांधी पुतळा परिसर जलमय झाला होता. यामध्ये न.प. पाणी पुरवठा योजनेचा संपूर्ण जलसाठा खाली झाल्याने तसेच पाईपलाईन दुरूस्तीचे काम थंडबस्त्यात असल्याने येत्या तीन दिवसपर्यंत इंदिरानगर भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.न.प. प्रशासनाचा संबंधीत बांधकाम कंत्राटदारावर वचक नसल्याने गेल्या आठवभरात जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडली. शिवाय त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण होत आहे. स्थानिक न.प. च्यावतीने साडेतीन कोटींच्या खर्चातून महादेवराव ठाकरे पुतळा ते न.प. माध्यमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूच्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. संबंधीत रस्त्याचे बांधकाम दोन वेगवेगळ्या ठेकेदारांकडे सोपविण्यात आले आहे. ठाकरे पुतळा ते इंदिरा गांधी पुतळा न.प. माध्यमिक शाळा अशा पद्धतीने कामाची विभागणी करण्यात आली आहे. हा संपूर्ण भाग वर्दळीचा असताना संबंधीत ठेकेदारांची कामाची पद्धत तसेच राबत असलेल्या कामाची संथगती नारिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्ता बांधकामदरम्यान तांत्रिक बाबी जोपासल्या जात नसल्याने गेल्या आठवडाभरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या. आठ दिवसापूर्वी हजरत दिनाशावली मस्जिद ट्रस्ट समोरील जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना चार दिवसपर्यंत पिण्याचे पाणी मिळाले नाही. या दरम्यान संबंधीत ठेकेदार व न.प. पदाधिकारी यांचे दरम्यान आरोप प्रत्यारोप होवून कनगीतुरा रंगला. मंगळवारला पुन्हा इंदिरा गांधी पुतळा परिसराची मुख्य जलवाहिनी फुटल्याने अर्धा दिवसपर्यंत या भागातील नाले ढोले तुडूंब भरून वाहिले. न. प. प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व बांधकाम ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे ही जलवाहिनी फुटली. यामध्ये इंदिरा नगर व परिसरातील नागरिकांना तीन दिवसपर्यंत पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. न.प. मुख्याधिकारी पदाधिकाऱ्यांचा कार्यालयीन कामकाजासोबतच इतर बाबींवर वचक नसल्याने बेबंदशाही वाढीस लागल्याची टिका होत आहे.

टॅग्स :Waterपाणी