शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नगराध्यक्षाला दोन आठवडे दिलासा

By admin | Updated: October 5, 2016 01:40 IST

नगर परिषद अध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना राज्य शासनाने नगर पालिका कायद्याच्या ५५ (अ) व ५५ (ब) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

उच्च न्यायालयाचे आदेश : कारवाईकरिता शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा वर्धा : नगर परिषद अध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना राज्य शासनाने नगर पालिका कायद्याच्या ५५ (अ) व ५५ (ब) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसविरोधात कुत्तरमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून स्थगनाादेश आणला होता. या स्थगनादेशाला पालिकेचे उपाध्यक्ष कलम कुलधरीया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी प्रकरण बंद करीत नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना दोन आठवड्याचा दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून होणाऱ्या कारवाईचा नगराध्यक्षांवर दोन आठवडे कोणताच प्रभाव होणार नसल्याचे म्हटले आहे. शिवाय न्यायालयाच्या आदेशाविरोधात त्यांना न्यायालयात जाण्याची मुभा असल्याची माहिती कुलधरीया यांचे वकील शंतनू भोयर यांनी दिली. येथील नगराध्यक्ष कुत्तरमारे यांनी वर्धा पालिकेत नियमानुसार नगरसेवकांच्या सभा घेतल्या नाही. तसेच त्यांच्या अधिकारात येत नसताना त्यांनी अमेरीकेच्या एका सेवाभावी सस्थेला वर्धेत काम करण्याकरिता सहकारी बनवून घेतले. त्यांच्या मुलाचा पालिकेत वाढत असलेला हस्तक्षेप या विरोधात उपाध्यक्ष कुलधरीया यांनी राज्य शासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. या अहवालावरून राज्य शासनाने त्यांना पालिका अधिनियम १९६५ चे कलम ५५ (अ) (पदमुक्त करणे), ५५ (ब) (सदस्यता रद्द करणे) नुसार नोटीस बजावली होती. हा नोटीस मिळण्यापूर्वीच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यांना ३० आॅगस्ट २०१६ रोजी कुत्तरमारे यांना सदर नोटीस प्राप्त झाली. याचवेळी मुंबई येथे नगरविकास मंत्रालयात त्याची सुनावणी सुरू होती. याची माहिती मिळताच कुलधरीया यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती बी. आर. गवई व व्ही. एम. देशपांडे यांनी निकाल दिला. त्यांच्या निकालानुसार या प्रकरणात शासनाकडून होणाऱ्या कारवाईचा किमान दोन आठवडे नगराध्यक्षांवर कुठलाही प्रभाव होणार नाही असे म्हटल्याची माहिती कुलधरीया यांचे वकील शंतून भोयर यांनी दिली. कुलधरीया यांच्या बाजूने नागपूर येथील अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. निखील जोशी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)