शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतींना ‘अच्छे दिन’ ची प्रतीक्षा

By admin | Updated: April 21, 2016 02:33 IST

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शहराचा व तालुक्याचा विकास होत असल्याचा गवगवा केला जात आहे.

घोराड : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शहराचा व तालुक्याचा विकास होत असल्याचा गवगवा केला जात आहे. पण तीन वर्षांपासून सेलू येथील तहसील व आरोग्य विभागाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्णावस्थेत आहे. क्रीडा संकुलाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात आहे. तर तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्या जीर्ण इमारतीला अच्छे दिनची प्रतीक्षा कायम आहे.सेलू गावाला नगराचा दर्जा देत नगर पंचायत अस्तित्वात आली. पण अद्याप ग्रामपंचायतच्या इमारतीतूनच कारभार पहावा लागत आहे. सभापतींना वेगळा कक्ष नाही. सभेसाठी वेगळा हॉल नाही. त्यामुळे नगर पंचायतीची नवीन इमारत कधी होणार याकडे सेलू वासीयांचे लक्ष लागले आहे. जुन्याच इमारतीला नवे नाव नवे रूप देण्यात आले. ज्या खुर्चीवर सरपंच-उपसरपंचाचा नामफलक होता तिथे अध्यक्ष व उपाध्यक्ष हा बदल करण्यात आला. गत पाच वर्षाअगोदर क्रीडा संकुलाची इमारत बांधून पूर्ण झाली. ही इमारत तालुका क्रीडा अधिकारी आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोट्यवधी रूपयांची जागा मैदानासाठी राखीव आहे. असे असले तरी या क्रीडासंकुलातून खेळाडूंना मार्गदर्शन तर दुरच पण या संकुलाचे उद्घाटन होऊन खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी हे मैदान खुले कधी होणार हा संशोधनाचा विषय आहे. क्रीडा संकुल केव्हा सुरू होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. परिणामी सुसज्ज इमारत आज शोभेची वास्तू म्हणून उभी असून तिची दुरवस्था व्हायला वेळ लागणार नाही असे बोलल्या जात आहे. गत तीन वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे व नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. किरायाच्या इमारतीतून तीन वर्षांपासून तहसील कार्यालयाचा कारभार चालत आहे. पण बांधकामाच्या गती अतिशय मंद असल्याचे दिसत आहे. कंत्राटदारावर कारवाई होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत असल्याचे बोलल्या जात आहे. दोन्ही इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतानाही बांधकाम विभाग ठोस पावले का उचलत नाही हे देखील न उलगडणारे कोडेच आहे. त्याचप्रमाणे गत दोन वर्षापासून पंचायत समिती कार्यालयाची इमारत छतावर ताडपत्रीचे पांघरूण घेवून जीर्णावस्थेत उभी आहे. कवेलूही अद्याप बदलविलेले नाही. पण अशाही स्थितीत इमारतीत नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. गोदामासाठी इमारत किरायाणे घ्यावी लागली आहे. जिर्णावस्थेत असलेल्या खोल्यामधून एकात्मिक बाल विकास, शिक्षण, पशुधन आदी कार्यालयांचे कामकाज चालते.तसेच तालुका कृषी विभागाला स्वतंत्र मालकीची इमारत नाही. कृषी अन्वेषण विभागाच्या जागेतच फलोद्यान, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांंची कार्यालय आहेत. या इमारतीकडे पाहिल्यानंतर कृषी क्षेत्राचा विकास दृष्टीक्षेपात येतो. येथील कृषी साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या गोदामाची दुरवस्था पाहिल्यानंतर तालुक्यातल्या शासकीय इमारतीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी शासन निधी देतील का हा ही प्रश्न कायम आहे.तालुक्यात आजतागायत शेतीच्या बांधापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही. कृषी प्रक्रिया उद्योग उभा राहिला नाही. औद्योगिक वसाहत दिवास्वप्न ठरत आहे.(वार्ताहर)