शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विनोबा भावे उड्डाणपूल धोकादायक वळणावर

By admin | Updated: May 22, 2014 01:25 IST

स्थानिक बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

वर्धा : स्थानिक बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

अतिमहत्त्वाच्या या उड्डाणपुलावर सध्या हजारावर खड्डे पडले आहेत. यवतमाळ तसेच हिंगणघाटकडे दिवसाला हजारो वाहने याच पुलावरून धावत असतात. नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. पुलावर असंख्य खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना येथून मार्गक्रमण करताना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो. पूल नुतनीकरण प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पडलेला आहे. त्यामुळे पुलाची तात्पुरती दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुलाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होणे नित्याची बाब झाली आहे.

बहुतांश वेळा शहरातील बजाज चौकात वाहतूक विस्कळीत झाल्यास दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागते. पुलावरील खड्डय़ांमुळे अपघाताच्या किरकोळ घटनाही दररोज घडत असल्याचे दिसून येते. कृषी उत्पन्न बाजार समितीही पुलाखालीच असल्याने शेतकर्‍यांना आपल्या मालाची ने-आण येथूनच करावी लागते. या पुलाची जीर्ण अवस्था झालेली असल्याने पूल कधी कोसळेल याचा नेम राहिलेला नाही. यात मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे. या पुलाचे विस्तारीकरण मंजूर झाल्याची माहिती होती; पण ते कामही मोजणीनंतर रखडल्याचेच दिसून येत आहे. प्रचंड वाहतुकीमुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. नुकताच बजाज चौकातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले; पण पुलावर अस्तरीकरण करण्याचे सौजन्य कुणी दाखविले नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(स्थानिक प्रतिनिधी)