शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विजयाची ओव्हर हॅट्ट्रिक

By admin | Updated: October 19, 2014 23:59 IST

देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघावर काँगे्रसचा वरचष्मा होता़ स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये एक-दोन अपवाद वगळता काँगे्रसच्या उमेदवारानेच येथे बाजी मारली आहे़ १९९९ पासूनही काँगे्रसच्या

देवळी मतदार संघ : चौथ्यांदा विजयाचा जल्लोष वर्धा : देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघावर काँगे्रसचा वरचष्मा होता़ स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये एक-दोन अपवाद वगळता काँगे्रसच्या उमेदवारानेच येथे बाजी मारली आहे़ १९९९ पासूनही काँगे्रसच्या रणजीत कांबळे यांनी एकतर्फी सत्ता गाजविली आहे़ गत विधानसभा निवडणुकीत काँगे्रसला ३ हजारांवर अल्प मतांनी विजय मिळविता आला होता़ यंदाच्या निवडणुकीत त्यापेक्षाही कमी मतांनी कांबळे यांना विजय मिळविता आला आहे़ असे असले तरी चौथ्यांदा विजय प्राप्त करण्याची किमया काँगे्रसचे कार्यकर्ते व आ़ रणजीत कांबळे यांना साधता आली आहे़ स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये दिवंगत प्रभा राव यांनी अनेक वर्षे काँगे्रसचा गड राखला़ यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत रणजीत कांबळे यांचे पदार्पण झाले़ त्यांनीही राव यांच्या पावलावर पाऊल टाकत विजयाचे गणित जुळवून आणले़ पुन्हा २००५ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले होते़ यानंतर २००९ मध्ये कांबळे यांनी विजयाची हॅट्ट्रीक साजरी केली़ यावेळी पुन्हा सार्वजनिक पाणी पुरवठा, स्वच्छता व बांधकाम राज्यमंत्रीपद देण्यात आले़ यंदाची निवडणूक मात्र त्यांच्याकरिता अटीतटीची ठरली़ सर्वच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात असल्याने काँगे्रसला विजय प्राप्त करणे कठिण होईल, अशी मते व्यक्त होत होती़ मतमोजणी सुरू असताना काहीशी ती खरी ठरत असल्याचेही वाटत होते; पण मतमोजणी अंतिम टप्प्यात येत असताना काँगे्रसच्या बाजूने कौल झुकताना दिसून आला़अखेर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत भाजपच्या सुरेश वाघमारे यांना पराभूत करून रणजीत कांबळे यांना केवळ ९४३ मतांनी विजय प्राप्त करता आला़ काँगे्रसचे रणजीत कांबळे यांना ६२ हजार ५३३ मते तर भाजपचे सुरेश वाघमारे यांना ६१ हजार ५९० मते प्राप्त झालीत़(कार्यालय प्रतिनिधी)