शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचे लोकनेते दत्ता मेघे अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:30 IST

Vardha : विदर्भातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व माजी खासदार, लोकनेते दत्ता राघोबाजी मेघे अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पवनार येथील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वर्धा/पवनार : विदर्भातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व माजी खासदार, लोकनेते दत्ता राघोबाजी मेघे अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पवनार येथील त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह अनेक आजी व माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

दत्ता मेघे यांचे रविवारी रात्री नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव सावंगी (मेघे) येथील निवासस्थानी आणण्यात आले. तेथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, विद्यार्थ्यांसह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. तेथून दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास सजविलेल्या ट्रकवरून त्यांची अंत्ययात्रा निघाली.

वर्धा शहरातून अंत्ययात्रा जात असताना ठिकठिकाणी त्यांना हारार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही अंत्ययात्रा पवनार येथील त्यांच्या शेतात पोहोचली. तेथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

पोलिसांनी झाडल्या तीन फैरी

दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आकाशात तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. ज्येष्ठ पुत्र माजी आमदार सागर मेघे आणि कनिष्ठ पुत्र हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खासदार अमर काळे, आमदार अॅड. अभिजित वंजारी, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार चरण ठाकूर, माजी मंत्री रणजित देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हाधिकारी वान्मथी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्यासह माजी खासदार, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री रणजित देशमुख पोहोचले व्हीलचेअरवर

नागपूर येथील रहिवासी माजी मंत्री रणजित देशमुख आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे मित्रत्वाचे नाते राहिले आहे. हेच नाते देशमुख यांनी शेवटपर्यंत जपल्याचे दिसून आले. आज लोकनेते दत्ता मेघे यांच्या अंत्यदर्शनासाठी रणजित देशमुख यांनी व्हीलचेअरवर बसून थेट अंत्यविधीचे ठिकाण गाठले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Leader Datta Meghe Passes Away, Cremated with State Honors

Web Summary : Veteran Vidarbha leader Datta Meghe died and was cremated with state honors in Pawnar. Dignitaries including Chief Minister Fadnavis and Minister Gadkari attended. His sons, Sagar and Sameer Meghe, performed the last rites. Police fired three volleys as a mark of respect.
टॅग्स :Datta Megheदत्ता मेघेnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidarbhaविदर्भ