शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ घेणार विदर्भातील समस्यांचा वेध

By admin | Updated: June 4, 2014 00:16 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झाले असन आगामी काळात विद्यापीठात सामुदायिक रेडियो, सामुदायिक महाविद्यालय आणि अँकेडमिक स्टॉफ कॉलेज सुरू करणार

हिंदी विद्यापीठात पत्रकार परिषद : गिरिश्‍वर मिश्र यांची माहितीवर्धा :  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झाले असन आगामी काळात विद्यापीठात सामुदायिक रेडियो, सामुदायिक महाविद्यालय आणि अँकेडमिक स्टॉफ कॉलेज सुरू करणार असल्याची माहिती विद्यापीठाचे नवे कुलगुरू प्रा. गिरीश्‍वर मिश्र यांनी मंगळवारी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अनेक प्रकारचे लोकाभिमुख कार्यक्रम, उपक्रम आणि योजना सुरू करून हे विद्यापीठ वर्धा आणि विदर्भातील समस्यांचा वेध घेत कौशल्यावर आधारित नवे अभ्यासक्रमही सुरू करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेला कुलसचिव प्रा. देवराज, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रा. अनिल कुमार राय, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे उपस्थित होते.विद्यापीठाचे चवथे कुलगुरू म्हणून कार्यभार ग्रहण केल्यानंतर ते प्रथमच पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. विद्यापीठातील अभ्यासक्रम, उपक्रम आणि कार्यक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले की परिसरातील समाजाच्या गरजा लक्षात घेवून आम्ही नवनवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अभ्यासक्रम कसे असावेत हे ठरविण्यासाठी नुकतीच वर्धेतील प्राचार्यांसोबत एक बैठक घेण्यात आली असेही ते म्हणाले. सामुदायिक महाविद्यालय, सामुदायिक रेडिओ तथा अकादमिक स्टाफ कॉलेज सारख्या संकल्पना लवकर प्रत्यक्षात येतील असे सांगून प्रो. मिश्र म्हणाले , लोकाभिमुख योजना आणि रोजगारप्रधान अभ्यासक्रमाच्या दिशेने विद्यापीठ तत्पततेने पावले उचलत आहे. केवळ हिंदीच नव्हे तर इतर भारतीय भाषांसोबत परस्पर संवाद कायम करण्याच्या दिशेने विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. वर्धा संस्कार हा कार्यक्रम कलात्मक अभिरूचीला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून वर्धेतील कला, संस्कृती आणि लोककलावंतांना व्यासपीठ मिळेल. तसेच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राममनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे यांसारख्या व्यक्तींवर  सार्वजनिक व्याख्यानांचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे. यात वर्धेतील महाविद्यालये, विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल असेही ते  ते म्हणाले. विद्यापीठाच्या वतीने विदर्भ आणि वर्धा परिक्षेत्रातील विविध समस्यांवर सातत्याने सर्वेक्षण करण्यात येत असून त्यातील निष्कर्षाच्या आधारे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. ऑक्सफोर्डच्या धर्तीवर वर्धा हिंदी शब्दकोश तयार करण्यात आला असून केवळ भाषा आणि साहित्यच नव्हे तर तज्ञांच्या क्षेत्रात विद्यापीठाने नवे प्रतिमान स्थापित केले आहे. हिंदीचा पहिला स्पेल चेकर तयार करण्याचा मानही विद्यापीठाला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)