शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षकांची निवासस्थाने सुविधांपासून वंचित

By admin | Updated: May 15, 2014 01:41 IST

वनविभागाने लाखो रुपये खर्ची घालून उभारलेली निवासस्थाने वनरक्षकाविना अद्याप ओस पडली आहेत. याप्रकरणी वरिष्ठांनी अहवाल मागितला;

लाखो रुपयांचा खर्च : ओस पडल्या वस्तू, वनसुरक्षाही वार्‍यावरसमुद्रपूर : वनविभागाने लाखो रुपये खर्ची घालून उभारलेली निवासस्थाने वनरक्षकाविना अद्याप ओस पडली आहेत. याप्रकरणी वरिष्ठांनी अहवाल मागितला; मात्र कारवाईचा थांगपत्ता नाही. यामुळे ही निवासस्थाने अद्याप दुर्लक्षीत आहेत.वनरक्षकांची निवासस्थानी सातत्याने गैरहजेरी राहत असल्यामुळे, अवैध वृक्षतोड, गुरेचराई, वन्यजीवांच्या शिकारीला प्रतिबंध घातला जाण्याऐवजी चालना मिळत असल्याचा प्रत्यय येत आहे. समुद्रपूर वनपरिक्षेत्रात अवैध शिकारीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याची खातरजमा करणार्‍या प्रकरणांच्या नोंदी केवळ वनविभागाच्या दस्ताऐवजात ठेवण्यासाठीच आहे; मात्र वन्यजीव संर्वधनाकरिता कुठल्याही ठोस उपायोजना सध्या कार्यान्वित नाहीत. या भागातील वन आणि वन्यजीव वनरक्षकांच्या अनुपस्थितीने पोरकी झाली आहेत. तालुक्यातील गिरड मंगरुळ सहवन परिक्षेत्रातील वनरक्षकांनी निवासस्थाने बेवारस झाली आहेत. या प्रकाराने विनाकारण निवासस्थानाच्या दुरुस्तीचा आणि वीजदेयकाचा भुर्दंड वनविभागाच्या तिजोरीवर पडत आहे.तालुक्यातील गिरड, मंगरुळ सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ आणि वानरचुहा येथील वनरक्षक तैनात नसतो. त्यामुळे अवैध वृक्षतोड आणि वाहतुकीला मोकळे रान उपलब्ध झाले आहे. सर्व सोयीयुक्त तपासणी नाके सध्या वनरक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र वनरक्षकही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत, असावे अशी स्थिती आहे. गिरड सहवन परिक्षेत्रातील गिरड, खुर्सापार, मोहगाव, तावी येथील वनरक्षकांचे निवासस्थाने मागील एक वर्षापासून बंद आहेत. निवासस्थानांकडे कोणी फिरकतही नाही. काही निवासस्थाने कुलूपबंद आहेत. त्यामुळे परिसरात झुडपांचा वेढा पडला आहे.ताडगाव येथील वनरक्षकांच्या निवासस्थानांची अवस्थाही अशीच आहे. या समस्येकडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)