शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आता आठ ठिकाणी मिळणार १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 5:00 AM

वर्धा शहरातील महात्मा गांधी लेप्रसी फाऊंडेशन, हिंगणघाट येथील टाकाग्राऊंड उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय पुलगाव तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा.) या केंद्रांवरून सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जात आहे. सदर वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यासाठी सुरुवातीला राज्य शासनाकडून वर्धा जिल्ह्याला कोविशिल्ड या लसीचे पाच हजार डोस देण्यात आले होते.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून कोव्हॅक्सिनचे मिळाले आठ हजार डोस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना २ मे रोजीपासून कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे. पाच केंद्रांवरून सध्या या लाभार्थ्यांना कोविडची व्हॅक्सिन दिली जात असून, राज्य शासनाकडून गुरुवारी कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस मिळाल्याने तीन केंद्रांची वाढ करण्यात येणार आहे.वर्धा शहरातील महात्मा गांधी लेप्रसी फाऊंडेशन, हिंगणघाट येथील टाकाग्राऊंड उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय पुलगाव तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा.) या केंद्रांवरून सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जात आहे. सदर वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यासाठी सुरुवातीला राज्य शासनाकडून वर्धा जिल्ह्याला कोविशिल्ड या लसीचे पाच हजार डोस देण्यात आले होते. तर गुरुवारी याच वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र नाहीत, त्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात येत्या काही तासात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आरोग्य विभागाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठकही पार पडल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. 

प्रत्येक केंद्राला प्रतिदिवशी शंभरचे उद्दिष्टऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याबाबत शेड्यूल घेतलेल्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यालाच कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर प्रतिदिवशी केवळ शंभर व्यक्तींनाच कोविडची व्हॅक्सिन दिली जाणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस