शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

एकाचदिवशी तब्बल १३,३८९ व्यक्तींना व्हॅक्सिनेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण सध्या अतिशय अल्प लसीचा साठा पाठवून वर्धा जिल्ह्याची कोंडी केली जात आहे. असे असले तरी तोकड्या लसीच्या जोरावर वर्धेचा आरोग्य विभाग मोठी मजल मारत आहे. शासनानेही वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्याला मुबलक लसीचा साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देलसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद : आरोग्य विभागाने नोंदविला लसीकरणाचा नवा विक्रम

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाचदिवशी तब्बल १५ हजार व्यक्तींना काेविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात सोमवारी लसीकरण मोहिमेला नव्या जोमाने गती देण्यात आली. या लसीकरण मोहिमेला वर्धेकरांनीही स्वयंस्फूर्त प्रतिसाद देत सोमवारी एकाच दिवशी तब्बल १३ हजार ३८९ व्यक्तींनी कोविडची लस घेतली. एकाच दिवशी १३,३८९ व्यक्तींना लसीकरण करून आराेग्य विभागाने जिल्ह्यात नवीन विक्रम नोंदविला आहे.रविवारी शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध होताच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील तब्बल ७१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्येक केंद्रावरून ऑनलाईन शेड्यूल घेऊन येणाऱ्यांसह स्पॉट नोंदणी करणाऱ्यांना कोविड व्हॅक्सिन देण्यात आले. सोमवारी सहा हेल्थकेअर वर्कर्सनी, ६६ फ्रन्टलाईन वर्कर्सनी, १८ ते ४४ वयोगटातील ५ हजार ९९२, ४५ ते ६० वयोगटातील ४ हजार ५४४, तर ६० पेक्षा जास्त वयोगटाच्या २ हजार ८६१ लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली.

लस कोंडीमुळे येताहेत अनेक अडचणीजिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण सध्या अतिशय अल्प लसीचा साठा पाठवून वर्धा जिल्ह्याची कोंडी केली जात आहे. असे असले तरी तोकड्या लसीच्या जोरावर वर्धेचा आरोग्य विभाग मोठी मजल मारत आहे. शासनानेही वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्याला मुबलक लसीचा साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.लसीकरण मोहिमेने ओलांडला ४.१४ लाखांचा टप्पा- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ४.१४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिनचा पहिला, तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तशी नाेंद आरोग्य विभागाने घेतली आहे.

कोविड व्हॅक्सिनेशन मोहिमेला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी पूर्वीचे विक्रम मोडत एकाच दिवशी १३ हजार ३८९ व्यक्तींना कोविडची लस देऊन जिल्ह्यात नवा विक्रम नोंदविण्यात आला आहे. शासनाकडून टप्प्या-टप्प्याने लस उपलब्ध होत आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस