शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

रेती उपसण्याकरीता जेसीबीसह यंत्रांचा वापर

By admin | Updated: May 23, 2014 00:09 IST

पर्यावरण विभागाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत अनेक ठिकाणी रेती घाटधारक रेतीचा अति उपसा करीत आहेत़ यासाठी सर्रास जेसीबीसह अन्य यंत्रांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे़

वर्धा : पर्यावरण विभागाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत अनेक ठिकाणी रेती घाटधारक रेतीचा अति उपसा करीत आहेत़ यासाठी सर्रास जेसीबीसह अन्य यंत्रांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे़ हा प्रकार अनेक ठिकाणी केला जात असताना प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे़ या प्रकारामुळे नदीचे पात्र मात्र धोकादायक ठरत आहे़ रेतीच्या उपस्याकरिता घाट धारकांनी थेट नदीच्या पात्रातच अनेक ठिकाणी रस्ता केल्याचे दिसून येते़ या रस्त्यावरून मोठ-मोठी यंत्रे, जेसीबी, पोकलॅण्ड यासह अन्य वाहने थेट रेतीपर्यंत नेली जातात़ या प्रकारामुळे नदीचे पात्र धोक्यात आले आहे़ नदीपात्रात मोठे व खोल खड्डे पडल्याने ते धोकादायक ठरत आहे़ यात पर्यावरण नियमांचेही सर्रास उल्लंघन केले जात आहे़ पर्यावरणाच्या सबबीखाली शासनाने तब्बल दोन महिने रेती उपस्यावर बंदी घातली होती. यामुळे जिल्ह्यात विकासकामे ठप्प पडली़ यानंतर मागील महिन्यात वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यात आली; पण यासाठी शासनाने काही अटी घालून दिल्यात़ यात ठरवून दिलेल्या जागेतूनच वाळूचा उपसा करावा, जेसीबीचा वापर करू नये, नदीचे पात्र अधिक खोल होणार नाही, याची काळजी कंत्राटदारांनी घ्यावी, अशा अनेक अटींचा समावेश होता; पण हे नियम धाब्यावर बसविण्यात आले़ काही तालुक्यांत एक महिना मिळालेल्या संधीचे सोने करीत घाट धारकांनी लागलेला पैसाही वसूल केला़ चिरीमिरीच्या नादात अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने घाटधारकांचे फावले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)