शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 5:37 PM

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवालजिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे सादर

वर्धा : जिल्ह्यात ८ आणि ९ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे ३,०५४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून, ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात १ जानेवारीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच ८ आणि ९ जानेवारी रोजी दोन दिवस तुफानी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. प्रामुख्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, १,७६५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्यात ५६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कारंजा तालुक्यात ७२७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. गव्हाचे २८९ हेक्टरवर नुकसान झाले असून, हरभरा १,१९६ हेक्टर, कापूस ८४ हेक्टर, तूर ७५९ हेक्टर, ऊस ३ हेक्टर, फळपिके ६६६ हेक्टर, भाजीपाला १ हेक्टर तसेच इतर पिकांचे ५६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. पिके पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

पावसाने मांडले ठाण

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. सततच्या पावसामुळे गहू, हरभरा सोंगणीचे काम लांबणीवर पडले आहे. सोंगणी केलेले पीक शेतात ओले झाले आहे. तर अशा वातावरणामुळे फळांच्या दरांवरही परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

३३ टक्क्यांवर झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका   -   नुकसान क्षेत्र

आर्वी      -     ५६२

आष्टी      -       १,७६५

कारंजा   -         ७२७

पिकांचे झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका गावे शेतकरी गहू हरभरा कापूस तूर फळपिके

आर्वी - ११ ८९८ २४ २६४ ८४ १७८ १२

आष्टी - २२ १९३९ १११ ८३० ०० ५८१ १८७

कारंजा - १९ ९४६ १५४ १०२ ०० ०० ४६७

५२ गावांतील ३,७८३ कुुटुंबं बाधित

८ व ९ जानेवारी रोजी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच तिन्ही तालुक्यातील ५२ गावांतील तब्बल ३ हजार ७८३ कुटुंबं बाधित झाली असून, त्यांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसHailstormगारपीटweatherहवामानFarmerशेतकरी