शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना लाकूड भरलेला ट्रॅक्टर जप्त

By admin | Updated: May 15, 2017 00:31 IST

वानरविहीरा शिवारातून लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वनविभागाने पकडला. त्यावर सायंकाळपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नव्हती.

वनविभागाची कारवाई : अवैध लाकूड कटाईची चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क बोरधरण : वानरविहीरा शिवारातून लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वनविभागाने पकडला. त्यावर सायंकाळपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. या ेट्रॅक्टरवर वनविभागाकडून काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, एमएच ३२ ए ८३६६ क्रमांकाचा ट्रॅक्टर वानरविहिरा गावानजीक रविवारी दुपारी १२ वाजता आडजात लाकडे घेवून जात असल्याचे क्षेत्रसहाय्यक गणेश कावळे यांच्या लक्षात आले. त्यांनी या ट्रॅक्टरला अडविले. या वाहनातील लाकडांची चौकशी केली असता ट्रॅक्टर मालकाजवळ परवानाच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर ट्रॅक्टर हिंगणी येथील वनविभाग कार्यालयात आणण्यात आले. यावेळी चालक कवडू हरिश्चंद्र ढाकरे रा. धानोली (मेघे) यांनी ट्रॅक्टर हमीद अन्सारी यांच्या मालकीचा असून यात बंटी दुबे यांच्या मालकीची लाकडे असल्याचे सांगितले. गत काही दिवसांपासून या मार्गाने अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचे अनेकांकडून बोलले जात होते. यात आज वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमळे यावर हे सत्य असल्याचे दिसून आले. शिवाय आजच्या कारवाईने यावर वचक बसेल, अशी चर्चा आहे. मात्र या भागात अवैधरीत्या लाकूड कटाई केली जात असल्याची चर्चाही जोरात आहे. हा सर्व प्रकार राजकीय वजनाखाली होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. सुटीच्या दिवशी ही कारवाई वनविभाग क्षेत्रसहाय्यक कावळे, सुनील कोडजावरे, मनोहर देशमुख यांनी केली.