अज्ञात वाहनाची कारला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:45 IST2018-11-03T21:44:41+5:302018-11-03T21:45:18+5:30
भरधाव कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जण ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निमगाव शिवारात झाला.

अज्ञात वाहनाची कारला धडक; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : भरधाव कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक जण ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निमगाव शिवारात झाला.
किरण नथ्थुजी हिवरे (२२) रा. पवनार, असे मृताचे तर निखील गोल्हर, अक्षय हिवरे व श्रद्धा जोगे अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, किरण हिवरे, निखील गोल्हर, अक्षय हिवरे व श्रद्धा जोगे हे एम.एच. ३१ एन. ८४३१ क्रमांकाच्या कारने अमरावती येथे गेले होते. ते शुक्रवारी रात्री परतीचा प्रवास करीत असताना वाहन निमगाव शिवारातील पावडे यांच्या शेताजवळ आले असता कारला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात किरण हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर निखील गोल्हर, अक्षय हिवरे व श्रद्धा जोगे हे जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती सावंगी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.